Share

रोहित टी20 च्या कर्णधारपदावरून होणार मुक्त, ‘हा’ धडाकेबाज खेळाडू होणार नवा कर्णधार

रोहित शर्मा सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे. विराट कोहलीच्या जागी त्याला संघाची कमान सोपवण्यात आली होती, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्माला लवकरच टी-२० क्रिकेटच्या कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते. निवडकर्त्यांनी नव्या कर्णधारासाठी एका खेळाडूचीही निवड केली आहे.

अलीकडेच भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग म्हणाला होता की, रोहित शर्माला टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून विश्रांती दिली जाऊ शकते. निवड समितीने त्याचे म्हणणे ऐकून घेतले आहे. रोहितच्या कामाचा ताण कमी करण्यासाठी टीम इंडियाचे निवडकर्ते हा मोठा निर्णय घेऊ शकतात.

रोहित शर्मा सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, पण कोरोनामुळे तो दौऱ्यातील पहिला सामना खेळू शकेल की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी हार्दिक पांड्याला टी-२० क्रिकेटचा कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्या सध्या आयर्लंड दौऱ्यावर संघाचे नेतृत्व करत आहे.

निवड समितीच्या एका सदस्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “आम्हाला रोहित शर्माची जागा घेण्याची घाई नाही. पण त्याचवेळी त्याच्यावरचा कामाचा ताण सांभाळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच हार्दिक आमच्या प्लॅनमध्ये आहे कारण भविष्यात अनेक छोटे दौरे होणार आहेत आणि सध्या तो कसोटी प्लॅनमध्ये नाही.

भारत-इंग्लंड मालिकेचे अधिकृत प्रसारक सोनी स्पोर्ट्सने घेतलेल्या एका मुलाखतीत सेहवाग म्हणाला होता, “टी-२० मधील नवीन कर्णधारासह, रोहित ब्रेक घेऊ शकेल आणि कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी फ्रेश होण्यास सक्षम असेल. हे त्याला कामाचा ताण व्यवस्थापित करण्यास आणि मानसिक थकवा हाताळण्यास सक्षम करेल. विशेषतः त्याचे वय लक्षात घेता.

महत्वाच्या बातम्या
रुग्णालयात आत्मा घेण्यासाठी आले नातेवाईक, ओपीडीमध्येच करू लागले विधी, लोकं बघतच राहिले
देशी गायीच्या शेणापासून बनवले vedik plaster, जे उन्हाळ्यातही देते बर्फासारखा थंडावा, जाणून घ्या
होय संभाजीनगरच! औरंगाबादच्या नामांतराचा मुहूर्त ठरला; मुख्यमंत्री ठाकरेंचा धडाकेबाज निर्णय

खेळ ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now