Cricket: इंग्लंडकडून पराभव झाल्यावर रोहित ढसाढसा रडत होता, खेळाडू बॅगा भरत होते; मध्यरात्री तो मेसेज आला अन्…

Cricket: भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर कोट्यवधी भारतीय चाहत्यांच्या १५ वर्षांनंतरही टी २० मधील जागतिक विजयाच्या आशा मावळल्या आहेत. मात्र या पराभवाने कर्णधार रोहित शर्माचेही खुप दुःखी झाला आहे. त्यामुळे मैदानावर तो भावूक झाला आणि त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत.

रोहित डोके टेकवून बसला होता आणि आपले अश्रू पुसताना दिसत होता. मात्र यानंतर जेव्हा तो संघ ड्रेसिंग रुममध्ये पोहोचला तेव्हा रोहितला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तो ढसा ढसा रडला. त्यावेळी परिस्थिती अशी होती की सहकाऱ्यांनी रोहितला शांत केले.

माध्यमातील वृत्तानुसार, सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू आपले सामान बांधत होते. तेव्हा टीमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर रात्री उशिरा एक मेसेज आला की, खेळाडूंना घरी परतायला आणि न्यूझीलंड दौऱ्यावर निघालेल्या टीम मीटिंगसाठी एकत्र यायला सांगितल आहे. बैठकीदरम्यान प्रशिक्षक राहुल द्रविडने एक छोटेसे भाषण केले.

त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने संघातील खेळाडूंना संबोधित केले आणि भावूक झाला. यादरम्यान संघ व्यवस्थापनाने मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर या दोन राखीव गोलंदाजांसह सर्व सदस्यांचे आभार मानले. बैठक संपल्यावर सर्व खेळाडूंनी एकमेकांना मिठी मारली.

भारतीय क्रिकेट संघाचा टी २० विश्वचषक २०२२चा प्रवास भावनिक होऊन संपला. भारतीय संघाकडे सर्व संसाधने असूनही बहुराष्ट्रीय स्पर्धेत बाद फेरीचा अडथळा पार करण्यात पुन्हा एकदा अपयश आले. गट फेरीत भारतीय संघ ५ सामने जिंकून वरच्या स्थानावर होता.

टी २० विश्वचषकातील प्रवास संपल्यानंतर आता भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाला न्यूझीलंड दौऱ्यावर तीन टी२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. या दौऱ्यावर टी २० मालिकेतील कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे, तर शिखर धवन वन डे संघाचे नेतृत्व करेल.

महत्वाच्या बातम्या-
Cricket: घरात एकच बाप असावा, सात सात बाप असतील तर..; जडेजाची टिका रोहीत शर्माला झोंबणार
Cricket : विराट, रोहितची टी-२० संघातून कायमची हकालपट्टी; BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
rohit : विराट कोहली आणि रोहीत शर्मा निवृत्ती घेणार? राहूल द्रविडने अगदी स्पष्टच सांगीतलं..