वर्ल्डकपमधील मानहानीकारक पराभवानंतर पहीली कुऱ्हाड रोहीतवर; पांड्या होणार नवा कर्णधार

Cricket:  टीम  इंडियाचा टी २० वर्ल्ड कप २०२२ चा प्रवास आता संपला आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताचा १० गडी राखून पराभव करत अंतिम फेरीतील तिकीट निश्चित केले आहे. आता विश्वचषक संपल्यानंतर बीसीसीआयचे पुढील मिशन टी-२० विश्वचषक २०२४ आहे आणि त्यासाठी बोर्ड कठोर पावले उचलू शकते.

यामध्ये पहिला कठोर निर्णय कर्णधारपदाचा असेल. अर्थात स्पष्ट आहे, रोहित शर्माच्या कर्णधार पदावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. तर त्याच्या जागी हार्दिक पांड्या टीम इंडियाचा नियमित टी-20 कर्णधार असेल अशी चर्चा सुरू झाली आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, टी-२० फॉरमॅटमध्ये रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्या भारताचा कर्णधार बनू शकतो. खरंच, पुढचा टी-२० विश्वचषक अवघ्या दोन वर्षांवर आहे आणि समीकरण बघितलं तर, हार्दिक पांड्यासोबत दीर्घकाळ कर्णधारपदासाठी एक नवीन संघ असेल.

रोहित शर्माचे वय सध्या ३५ आहे, तर २०२४ मध्ये तो ३७ वर्षांचा होईल. अशा परिस्थितीत, त्याच्याकडे आता एकदिवसीय विश्वचषक २०२३ तसेच कसोटी चॅम्पियनशिपची जबाबदारी असेल, ज्यासाठी त्याला टी-२० फॉरमॅटमधून विश्रांती दिली जाऊ शकते. २०२४ च्या विश्वचषकापर्यंत टी-२० महत्त्वाचा असल्याने, भारत टी-२० मध्ये विभाजित कर्णधारपदाचा विचार करू शकतो.

दरम्यान, हार्दिक पांड्याने तीन सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे आणि यादरम्यान टीम इंडियाने सर्व सामने जिंकले आहेत. हार्दिकने आयर्लंड दौऱ्यावरील दोन सामन्यांच्या टी २० मालिकेत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकमेव टी २० सामन्याचे नेतृत्व केले आहे. यासोबतच न्यूझीलंड दौऱ्यासाठी तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठीही हार्दिकची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. आता किवी संघाविरुद्ध कर्णधार म्हणून हार्दिक कशी कामगिरी करतो हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

या वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा कर्णधार राहणार नाही, BCCI च्या अधिकाऱ्याने दिली धक्कादायक माहिती

Shrilanka : क्रिकेटविश्वात खळबळ! वर्ल्डकप सुरू असताना ‘या’ स्टार खेळाडूला बलात्काराच्या आरोपाखाली अटक