Share

मुंबईच्या संघात होणार ‘या’ मराठमोळ्या खेळाडूची एंट्री; अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूची रोहितने केली मागणी

mumbai

इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची स्थिती खुपच वाईट आहे. या संघाने आतापर्यंत ७ सामने खेळले असून त्यांना सर्व सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. आयपीएलमध्ये ५ वेळा विजेतेपद पटकावणारा मुंबई संघ अजूनही १५ व्या सिजनमधील पहिल्या विजयाच्या शोधात आहे. (rohit sharma wants dhawal kulkarni)

संघाच्या विजयासाठी रोहित शर्मा संघात बदल करताना दिसून येत आहे. असे असताना आता रोहित शर्माने अनुभवी वेगवान गोलंदाज धवन कुलकर्णीला संघात घेण्याची मागणी केल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे लवकरच या गोलंदाजाचा मुंबईच्या संघात समावेश होऊ शकतो, असेही म्हटले आहे.

३३ वर्षीय कुलकर्णी सध्या आयपीएल २०२२ सीझनमधील हिंदी कॉमेंट्री टीममध्ये सामील आहे. या सिजनमधील मेगा लिलावात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते, त्यामुळे तो आता कॉमेंट्री करत आहे. धवल कुलकर्णी हा मुंबईचा रहिवासी आहे.

मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील स्टेडियम या तीन मैदानांवर गोलंदाजी कशी करायची हे धवन कुलकर्णीला चांगलेच ठाऊक आहे. कुलकर्णी मुंबई संघात सामील झाल्यास रोहितला मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे रोहितने त्याला संघात घेण्याची मागणी केली आहे.

कुलकर्णीने आयपीएलमध्ये आतापर्यंत ९२ सामने खेळले असून त्यात ८६ विकेट घेतल्या आहेत. तो मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात लायन्सकडून खेळला आहे. २०२० च्या सिजनमध्ये कुलकर्णीला मुंबई संघाने ७५ लाख रुपयांना विकत घेतले होते. यानंतर, तो २०२१ च्या हंगामात मुंबई संघाचा भाग होता. पण तो मुंबईसाठी एकच सामना खेळला आहे.

धवल कुलकर्णीने टीम इंडियासाठी १२ एकदिवसीय आणि दोन टी-२० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० आणि टी-२० मध्ये ३ विकेट्स घेतल्या आहेत. या वेगवान गोलंदाजाने नुकतेच ३ रणजी सामने खेळले असून त्यात त्याने ७ विकेट्स घेतल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या संघाच्या वेगवान गोलंदाजीला धार देण्यासाठी कुलकर्णीचा समावेश करण्याची मागणी केली आहे. कुलकर्णी हा मूळचा मुंबईचा आहे, त्यामुळे मुंबई आणि पुण्यात गोलंदाजी कशी करायची हे त्याला चांगले माहीत आहे.

महत्वाच्या बातम्या-
…तर २०५० पर्यंत देशातील कोणताही माणूस उपाशी झोपणार नाही; गौतम अदानींचे मोठे वक्तव्य
मोदींचा फोटो पाहून अमेरिकेचा माणूस म्हणाला, हा माणूस तर आमच्या बारमध्ये रोज पाचवेळा येतो
खेसारीलालने मिठी मारताच ढसाढसा रडू लागली अभिनेत्री, वाचा शुटींगदरम्यान नक्की काय घडलं?

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now