IPL 2023 साठी कर्णधार रोहित शर्माने फुकले रणशिंग, म्हणाला, संघातील एकजूटपणा पुढील वर्षी..
रोहितने मुंबईच्या खराब कामगिरीवर सोडले मौन; म्हणाला, हा हंगाम अपेक्षेपेक्षा वाईट होता पण..
इंडियन प्रिमीयर लीग (IPL) 2022 मध्ये मुंबई इंडियन्स (MI) ची कामगिरी खराब होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ 14 सामन्यांपैकी केवळ चार सामने जिंकू शकला, ज्यामुळे ते गुणतालिकेत तळाशी होते. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सने एका मोसमात 10 सामने गमावले आहेत.
आता रोहित शर्माने आयपीएल 2022 मधील संघाच्या खराब कामगिरीबद्दल भाष्य केले आहे. संघातील एकजूटपणा मुंबईला पुढील वर्षी पुनरागमन करण्यास मदत करेल, असा विश्वास रोहितला आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरही पुढील हंगामात मुंबई इंडियन्स संघात सामील होण्याची शक्यता आहे.
आर्चर दुखापतीमुळे यंदाच्या संपूर्ण हंगामात उपलब्ध नव्हता. रोहित शर्माने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, ‘हा हंगाम अपेक्षेपेक्षा वाईट होता, परंतु आम्हाला शिकण्यावर आणि सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे आहे. संघातील खेळाडूंनी एकमेकांना कशी साथ दिली हे पाहूण खुप आनंद झाला.
आता पुढचा सीझन कसा पाहायचा आणि तयारी कशी करायची याकडे लक्ष केंद्रित करत आहे. आम्ही मोसमाचा शेवट उत्तम करायचा होता जे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. आम्ही आणखी ताकदीने परतणार आहोत. रोहित म्हणाला, ‘संघातील एकता हे चांगले लक्षण आहे. मी त्यापैकी एकालाही निराश पाहिले नाही.
आम्ही एक कुटुंब म्हणून एकत्र राहिलो. सराव सत्रात ते आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याचा मला अभिमान आहे. संघाचे वातावरण चांगले झाले आहे. आमचे एक ध्येय होते आणि प्रत्येकजण त्यावर काम करत होता. रोहित शर्मानेही संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळ करणाऱ्या युवा खेळाडूंचे कौतुक केले. टिळक वर्मा आणि डेवाल्ड ब्रेव्हिस यांनी काही प्रभावी खेळी खेळल्या.
रोहित म्हणाला की, भविष्यात काही युवा खेळाडू स्टार बनणार आहेत. दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सच्या यंदाच्या कामागिरीमुळे चाहते खुप निराश झालेले पाहायला मिळत होते. सुरूवातीपासूनच दोन्ही दिग्गज संघ तळाशी पाहायला मिळाले. दोन्ही संघांना खास अशी कामगिरी करता आली नाही. आता IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्स संघात काय बदल करणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महत्वाच्या बातम्या
कोल्हापूरच्या आकाशात उडणारी ‘ती’ वस्तू म्हणजे एलिएन्स? व्हिडीओ पाहून लोकं म्हणतात…
जंगलातच बिकीनीवर अंघोळ करताना दिसली श्वेता तिवारी, व्हिडिओ पाहून चाहत्यांना फुटला घाम
धनंजय महाडिक यांची माघार? महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला
आयटीआय विद्यार्थ्याला मिळणार थेट सेंकड इयर इंजिनिअरींगला प्रवेश, ट्रेड कोणताही असो…