IPL 2022 च्या हंगामात सलग पाचव्या पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा खूपच निराश दिसत होता. बुधवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबईचा 12 धावांनी पराभव केला. सामना संपल्यानंतर रोहित जेव्हा बोलत होता तेव्हा स्पष्ट दिसत होते की तो दुखी आहे.
पराभवासाठी त्याने अप्रत्यक्षपणे रणनीती, खराब फलंदाजी आणि सूर्यकुमार यादवला जबाबदार धरले. रोहित मॅचनंतर म्हणाला. ‘आम्ही सामन्यात चांगला खेळलो. आम्ही सामना जिंकण्याच्या अगदी जवळ आलो होतो. काही रनआऊट आमच्या विरोधात गेले. एक काळ असा होता की आम्ही सामन्यात समान टक्कर देत होतो.
आम्ही अजिबात हार मानली नाही, पण उत्तरार्धात पंजाब किंग्सने शानदार गोलंदाजी केली त्यांना याचे श्रेय दिले पाहिजे. रोहित म्हणाला, ‘आम्ही वेगळ्या मानसिकतेने सामना खेळत आहोत पण आमच्या योजना नीट काम करत नाहीयेत. चांगला खेळ दाखवलेल्या खेळाडूंनाही मला श्रेय द्यायचे नाही कारण पंजाबने खुप चांगला खेळ दाखवला.
आम्ही चांगले क्रिकेट खेळत नाही आहोत. काही परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार रणनीती अंमलात आणण्याची नितांत गरज आहे. पुढे रोहित म्हणाला की, ‘पंजाबची टीम टेक ऑफ करण्यासाठी उतरली होती. आमच्या गोलंदाजांवर दबाव होता, पण खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम होती.
मला वाटले 198 धावांचा पाठलाग करता येईल. मी आधी म्हटल्याप्रमाणे, आम्हाला ड्रेसिंग रूममध्ये परत जावे लागेल आणि चांगली तयारी करावी लागेल. कर्णधार रोहित म्हणाला, ‘मुंबई संघ स्वतःला दोष मानतो, कारण आमच्याकडून अनेक चुका झाल्या आहेत. डेवाल्ड ब्रेव्हिस बाद झाल्यावर सर्व काही विस्कळीत झाले.
सूर्यकुमार यादव दोन धावावर बाद झाला. हा रनआऊट टिळक वर्मा आणि कायरॉन पोलार्डचा होता. दोन्ही वेळेस सुर्यकुमार यादवची चुकी होती. शेवटी 10 चेंडूत 26 धावांची गरज असताना मुंबईचा संघ सामन्यात होता. त्यावेळी जयदेव उनाडकटने एकही धाव घेण्यास नकार दिला होता. त्याच्या पुढच्या चेंडूवर सूर्यकुमारने दबावाखाली मोठा फटका खेळला आणि तो बाद झाला.
या सामन्यात मुंबई संघाने एका अतिरिक्त गोलंदाजाला खेळायला उतरवले होते. यामुळे एक फलंदाज कमी पडला. 23 सामन्यांनंतर, 5 वेळा चॅम्पियन मुंबई हा एकमेव संघ आहे, ज्याने आतापर्यंत या हंगामात विजय मिळवलेला नाही. दरम्यान, या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 5 गडी बाद 198 धावा केल्या.
संघाकडून शिखर धवनने 50 चेंडूत 70 तर कर्णधार मयांक अग्रवालने 32 चेंडूत 52 धावा केल्या. मयंकला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ 9 विकेट्सवर 186 धावाच करू शकला आणि 12 धावांनी सामना गमावला. संघासाठी ब्रेव्हिसने 25 चेंडूत सर्वाधिक 49 धावा केल्या. सूर्यकुमारने 30 चेंडूत 43 धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या
सिमेंट उद्योगाला मोठा धक्का, कंपन्या चालल्या भारत सोडून; ACC, अंबूजासारख्या कंपन्या विक्रीला
भयानक! कोकणातल्या चार शिकाऱ्यांनी केला घोरपडीवर बलात्कार; ‘अशी’ झाली पोलखोल
गहू विकण्यासाठी अदानींच्या गोदामाबाहेर शेतकऱ्यांच्या रांगा, जाणून घ्या काय आहे यामागचे खरे सत्य
गणेश नाईक मला नर्सचा किंवा शालेय विद्यार्थीनीचा गणवेश घालायला लावायचे अन्…; महिलेचा गंभीर आरोप