Share

रोहितच्या जागी भारतीय संघाला मिळाला नवा कर्णधार, एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरू आहे. यातच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. विराट कोहलीला एकदिवसीय सामन्यांच्या कर्णधारपदावरुन पायउतार केल्यानंतर रोहित शर्माकडे नेतृत्व देण्यात आलं होतं.

पण दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी मालिकेतून रोहित शर्माने माघार घेतली होती. रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यास संघनिवड समितीकडून उशीर झाला.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत के. एल राहुलकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. तर गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा आणि रविंद्र जाडेजा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेला मुकणार आहेत. रोहित शर्माच्या जागी के. एल. राहुलकडे कर्णधापद सोपवण्याचा निर्णय निवड समितीने घेतला.

या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीला आराम देण्यात आला आहे. तर भारतीय संघात डावखुरा फलंदाज शिखर धवनचे पुनरागमन झाले आहे. या एकदिवसीय मालिकेत भारत आणि दक्षिण आफ्रिका हे संघ तीन सामने खेळणार आहेत. या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १९ जानेवारीला होणार आहे.

भारतीय संघ:- के. एल. राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), यजुवेंद्र चहल, आर. अश्विन, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

या मालिकेतील तीन सामन्यांपैकी दोन सामने ‘बोलंड पार्क, पार्ल’ या मैदानात व एक सामना ‘न्यू लँड्स क्रिकेट ग्राऊंड, केपटाऊन’ या मैदानात खेळवला जाणार आहे. भारतीय संघ तब्बल तीन वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करत आहे. यापूर्वी, भारतानं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता.

महत्वाच्या बातम्या :-
तालिबानच्या क्रुरतेचा कळस, माजी लष्करी अधिकाऱ्याचा केला छळ, व्हिडीओ पाहून धक्का बसेल
समीर वानखेडेंनी केले एनसीबीला बाय-बाय, १००० कोटींचे ड्रग्स जप्त ते सेलिब्रीटींना अटक; ‘असा’ होता कार्यकाळ
घटस्फोटाचा विषय काढताच ढसाढसा रडली रश्मी देसाई, म्हणाली, ‘आजही वेदना होतात’

खेळ

Join WhatsApp

Join Now