Homeइतरघटस्फोटाचा विषय काढताच ढसाढसा रडली रश्मी देसाई, म्हणाली, 'आजही वेदना होतात'

घटस्फोटाचा विषय काढताच ढसाढसा रडली रश्मी देसाई, म्हणाली, ‘आजही वेदना होतात’

कलाकारांच्या खाजगी जीवनामधील प्रत्येक घटना चर्चेचा विषय ठरत असते. त्यांच्या खाजगी जीवनात वाईट किंवा चांगली घटना घडो, त्यांना सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत राहतात. याचा परिणाम संबंधित कलाकारांवर नक्कीच पडतो. सध्या दोन वर्षांपासून जिच्या खाजगी आयुष्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे ती अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई. तिच्याबद्दल होत असलेल्या चर्चेबद्दल तिचा भावनिक बांध फुटला असून ती यावेळी सोशल मीडियावर हुंदके देत रडत आहे.

टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाईच्या प्रोफेशनल लाईफबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण तिचं वैयक्तिक आयुष्य देखील लोकांसमोर पूर्णपणे खुलून गेलं आहे. तिचे पहिले लग्न असो, नंदिश संधूसोबतचा घटस्फोट असो किंवा अरहान खानसोबतचे नाते आणि ब्रेकअप असो. तिचे वैयक्तिक आयुष्य गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. आता तिचा आणखी एक कमकुवत पैलू बिग बॉस १५ च्या ताज्या भागामध्ये दिसला, जिथे ती तिच्या पहिल्या लग्नाबद्दल भावूक झालेली दिसली. आजही ती विचार करून घाबरते, असा खुलासा तिने केला.

जेव्हा रश्मी ‘बिग बॉस १३’ मध्ये दिसली होती, तेव्हा तिचा बॉयफ्रेंड अरहान खाननेही घरात एन्ट्री घेतली होती. पण रश्मीच्या आयुष्यात भूकंप आला जेव्हा होस्ट सलमान खानने तिला सांगितले की अरहान आधीच विवाहित आहे आणि त्याला एक मूल आहे. रश्मीचे हे ऐकून प्रेक्षकांनाही धक्का बसला. यानंतर रश्मीने अरहानसोबतचे नाते संपवले.

आता बिग बॉस १५ मध्ये रश्मी आणि नंदिश संधू यांच्याबद्दल चर्चा झाली आहे. राखी सावंतने रश्मीला नंदिशसोबत घटस्फोट घेण्याचे कारण विचारले असता, सुरुवातीला रश्मी काहीही बोलण्यास नकार देते, पण नंतर ती म्हणाली की तिला याबद्दल बोलायचे नाही. समोरच्या व्यक्तीच्या (नंदिशच्या ) आयुष्यावर परिणाम होऊ शकतो म्हणून ती याबद्दल बोलण्यावर विश्वास ठेवत नाही.

राखी सावंतसोबतच्या या संवादानंतर रश्मी देसाई उद्यान परिसरातील तलावाजवळ रडताना दिसली. दरम्यान, राखी रश्मीवर खूप चिडलेली दिसत होती. अभिजित बिचुकले आणि उमर रियाझ यांनी राखीवर नाराजी व्यक्त केली. उमर म्हणाला कि, रश्मी नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील जुन्या गोष्टींबद्दल बोलण्यास उत्सुक असते, परंतु तिने स्वतःबद्दल काहीही उघड केले नाही. तेव्हा राखी रश्मीबद्दल म्हणते कि, ‘शाणी है वो, डेढ़ शाणी’

दुसरीकडे, उमर रश्मीकडे तिचे सांत्वन करण्यासाठी जातो. तो तिला विचारतो की ती का रडली आणि अशी परिस्थिती शांतपणे हाताळण्यास सांगतो. तेव्हाच रश्मीने खुलासा केला की तिच्या लग्नाचा आणि नंदिशचा विषय अजूनही तिला अस्वस्थ करतो. जेव्हा त्याच्याशी संबंधित काहीतरी येते तेव्हा ती तिचा तोल गमावते आणि तिला भीती वाटते. असे म्हणत ती हुंदके देत रडते. पुढे म्हणते, हा एक असा विषय आहे जो मला कायम दु:खी करुन जातो. त्याचा विषय येताच मी भान हरपते. जेव्हा कोणीही त्या आठवणी काढतं तेव्हाही भीती वाटते.

महत्वाच्या बातम्या

देवोलिना म्हणाली, तुझ्यापेक्षा गाढव पाळलेलं बरं; बिचुकलेला झाला राग अनावर, केलं असं काही की..
फक्त ९९ हजारांमध्ये घ्या ‘ही’ धडाकेबाज इलेक्ट्रिक स्कूटर; ८० रुपयांमध्ये चालणार ८०० किलोमीटर
सुधीर मुनगंटीवारांवर संतापली सोनम कपूर, म्हणाली, अडाणी…; जाणून घ्या नक्की काय घडलं