Share

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमबाबत रोहित शर्माने केले धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, या स्टेडियमचा…

सगळे क्रिकेटप्रेमी आयपीएल २०२२ ची आतुरतेने वाट पाहत आहे. तसेच आपापल्या आवडत्या संघांना खेळताना पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. असे असताना ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मान एक हैराण करणारे वक्तव्य केले आहे. (rohit sharma on wankhede stadium)

मला असे वाटत आहे की संघाला मुंबईच्या मैदानावर इंडियन प्रीमियर लीग खेळण्याचा फारसा फायदा होणार नाही. कारण यावेळचा मुंबईचा संघ बघितला असता, असे अनेक खेळाडू आहेत जे गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत खेळलेले नाहीत, असे रोहित शर्माने सांगितले आहे.

आयपीएलचा १५ वा सीझन २६ मार्चपासून सुरू होणार आहे. सीझनचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सध्या या सामन्याची चर्चा रंगली असताना रोहित शर्माने एक पत्रकार परिषद घेतली आहे.

रोहित शर्मा पत्रकार परिषदेत म्हणाला, मला आशा आहे की तुम्ही मेगा लिलाव पाहिला असेल. हा तुलनेने नवीन संघ आहे. संघात अनेक नवे खेळाडू आहेत, त्यामुळे मुंबईत सामने खेळून आम्हाला काही अतिरिक्त फायदा होईल, असे वाटत नाही. संघातील ७० किंवा ८० टक्के खेळाडू यापूर्वी मुंबईत खेळलेले नाहीत. त्यामुळे मोठा फायदा होण्यासारखे काही नाही.

२००८ मध्ये स्पर्धेच्या सुरुवातीपासून मुंबई इंडियन्स वानखेडे स्टेडियमवर त्यांचे घरचे सामने खेळत आहेत. बुधवारी या परिषदेत रोहित म्हणाला, फक्त मी, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, इशान किशन, जसप्रीत बुमराह यांनी मुंबईत बरेच सामने खेळले आहेत. इतर खेळाडूंना येथे खेळण्याचा अनुभव नाही, त्यामुळे अतिरिक्त लाभ घेण्यासारखे काही नाही.

रोहित पुढे म्हणाला, आम्ही सर्वजण २ वर्षांनंतर मुंबईत खेळत आहोत, आम्ही मुंबईत एकही सामना खेळलेला नाही. इतर संघ गेल्या वर्षी मुंबईत खेळला पण आम्हाला येथे खेळण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे अतिरिक्त फायदा होणार नाही.

महत्वाच्या बातम्या-
युट्युबने पालटले भावा बहीनीचे नशीब; एकेकाळी कर्जबाजारी होते पण आज लाखात कमवातहेत
भरधाव रेल्वेसमोर तरुणाने मारली उडी, प्राणाची बाजी लावत पोलिसाने वाचवला जीव; पहा थरारक व्हिडीओ
अमोल कोल्हे म्हणतात, मैं थकेगा नहीं साला… हातात टायर अंगात फायर; पहा कोल्हेंचा फिटनेस व्हिडिओ

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now