गुरुवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा मुकाबला बघायला मिळाला. सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने तीन विकेट्सने हा सामना जिंकला. आयपीएलच्या १५ व्या मोसमातील मुंबईचा हा सलग सातवा पराभव आहे. या सामन्याच्या पराभवामुळे मुंबईचे प्लेऑफमध्ये जाण्याचे स्वप्नही भंगले आहे. (rohit sharma on dhoni perfomance)
अखेरच्या षटकापर्यंत मुंबई जिंकेन असे वाटत होते. पण चेन्नईच्या महेंद्रसिंग धोनीने करिष्मा केला आणि संपूर्ण सामनाच पलटवला. धोनीने शेवटच्या षटकात धडाकेबाज फलंदाजी करत चेन्नईला थरारक विजय मिळवून दिला आहे. त्याने शेवटच्या चेंडूवर चौकार मारुन चेन्नईला विजय मिळवून दिला आहे.
आयपीएलच्या गुणतालिकेत मुंबईचा संघ तळाशी आहे. त्याचवेळी, चेन्नई सुपर किंग्ज पॉइंट टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. सीएसकेने ७ पैकी दोन सामने जिंकले आहेत तर पाच सामने गमावले आहेत. पण अजूनही चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीत असल्याचे म्हटले जात आहे.
या सामन्यात चेन्नईच्या मुकेश चौधरीने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने पहिल्याच षटकात मुंबईचे सलामीवर रोहित शर्मा आणि इशान किशनला शुन्यावर आऊट करुन तंबूत पाठवले. त्यानंतर सुर्यकुमार यादवने ३२. हृतिक शोकिनने २५, कायरन पोलार्डने १४ धावा केल्या.
मुंबईच्या १९ वर्षीय तिलक वर्माने ४३ चेंडूत ५१ धावा करत अर्धशतक ठोकले. त्याच्यामुळेच मुंबईच्या संघाला ७ बाद १५५ धावांचा स्कोर उभा करता आला. पण चेन्नईच्या मुकेशने गोलंदाजीमध्ये कमाल करत ३ विकेट्स घेतल्या, तर ड्वेन ब्राव्होने २ विकेट्स घेतल्या.
चेन्नईचा संघ फलंदाजीसाठी आला तेव्हा ऋतुराज गायकवाड पुन्हा एकदा काहीही कमाल दाखवू शकला नाही. ऋतुराज शुन्यावर आऊट झाला. तर मिचेल सँटरला ११ धावा करता आल्या. त्यानंतर रॉबिन उथप्पाने ३० तर अंबाती रायुडूने ४० धावा केल्या. पण नंतर दोघेही बाद झाले.
शिवम दुबे १४ धावा करुन बाद झाला. त्यानंतरही कोणत्या फलंदाजाला कमाल करता आली नाही. त्यानंतर धोनी आणि प्रेटोरिय हे दोघे खेळत होते. शेवटच्या षटकात १७ धावा लागत होत्या. तेव्हा धोनीच्या तुफान फटकेबाजीने मुंबईच्या हातातला सामना ओढून आणला. शेवटच्या चेंडूत ४ धावा लागत असताना धोनीने चौकार मारत चेन्नईला सामना जिंकवला.
सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहितने प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कडवी लढत दिली. सामन्यात आमची वाटचाल योग्य दिशेने सुरु होती. फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर गोलंदाजांनी आम्हाला विजयाच्या शर्यतीत ठेवले होते. पण धोनी समोर असताना विजय मिळवणे अवघडच होते. धोनी शांत राहून कसा सामना खेचून नेतो हे सर्वांना माहिती आहे, असे रोहितने म्हटले आहे.
नेमकं कुठे चुकलं हे सांगणं अवघड आहे. जर तुम्ही सुरुवातीलाच तीन किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स गमावल्या तर कमबॅक करणं अवघड असते. आम्ही मोठं आव्हान उभं करण्यात अपयशी ठरलो. त्यामुळे आम्हाला हा सामना गमवावा लागला, असे रोहित शर्माने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘अमोल मिटकरींना माफी मागावीच लागेल’; राष्ट्रवादीच्या नेत्याची जाहीर पोस्ट
‘निर्लज्जपणे दात काढणारे जयंत पाटील आणि तीन-चार बायका सोडणारे धनंजय मुंडे’, मिटकरींच्या ‘त्या’ विधानाने राजकारण तापलं
दिलदार दादा! जुन्या मित्राचा प्राण वाचवण्यासाठी अजित पवारांनी थेट अमेरिकेपर्यंत लावली फिल्डिंग