सध्या सर्वत्र होळीचा सण साजरा केला जात आहे. देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जात आहे. लोक त्यांच्या मित्रपरिवारासह होळी खेळत आहेत. कलाकार, राजकीय नेत्यांसोबतच क्रिकेटपटूही होळी साजरी करत आहे. अनेक खेळाडूंनी त्यांच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. (rohit sharma holi viral video)
आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सर्व चाहत्यांना आणि संपूर्ण देशाला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या रोहितला शुभेच्छा देणारा व्हिडिओ बनवताना घाम फुटला. अनेकवेळा प्रयत्न करुनही हवा तसा व्हिडिओ बनत नव्हता. त्यामुळे त्याला अनेक व्हिडिओ बनवावे लागले आहेत.
मुंबई इंडियन्सने ट्विटरवर रोहित शर्माचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा होळीचा व्हिडिओ बनवत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देत आहे, पण कर्णधार पूर्णपणे या व्हिडिओमध्ये गोंधळलेला दिसत आहे. यामुळेच रोहित शर्माला या व्हिडिओवरुन काहींनी त्याला ट्रोलही केले आहे.
Ye kis line mein aa gaye aap, Captain saab? 🤭
After 53261 takes, Ro wishes everyone a very Happy Holi! 🤣💙#OneFamily #MumbaiIndians @ImRo45 pic.twitter.com/bb3FJj1reX
— Mumbai Indians (@mipaltan) March 18, 2022
व्हिडिओ पोस्ट करताना मुंबई इंडियन्सने लिहिले की, कॅप्टन सर, तुम्ही कोणत्या लाईनमध्ये आला आहात? ५३२६१ टेक घेतल्यानंतर रोहित शर्माने सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. या व्हिडिओमध्ये रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह देखील दिसत आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की कोणता टेक योग्य आहे यावर रोहित सतत त्यांच्याशी वाद घालत असतो. यावेळी होळीच्या शुभेच्छा देताना रोहितला घाम फुटला असून सतत एकच गोष्ट करावी लागत असल्यामुळे तो वैतागलेला दिसून येत आहे. हा व्हिडीओ मस्करीमध्ये बनवण्यात आला असून चाहते त्याचा खूप आनंद घेत आहेत.
रोहित शर्मासह भारतीय खेळाडूंनीही सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. रवींद्र जडेजाने चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देताना लिहिले की, हा प्रेम आणि आनंदाचा सण आहे, तो तुमच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत साजरा करा. तर अनुभवी फलंदाज विराट कोहलीनेही चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! ‘द काश्मीर फाइल्स’ फुकटात पाहणे पडले महागात, एका झटक्यात गमावले ३० लाख रुपये
अंगाला भांडी चिटकवत राखीने केला बेली डान्स; पहा व्हायरल व्हिडीओ
आयुष्यच बेरंग झालं; रंगपंचमीच्या दिवशी आईच्या आठवणीत भावूक झाले मिलिंद गवळी