येत्या काही दिवसांत भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. जिथे भारतीय संघाला ३ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. भारतीय संघ २ गटात इंग्लंडला रवाना होणार आहे. पहिला गट १६ जूननंतर आणि दुसरा १९ जूननंतर उड्डाण करेल. (rohit sharma gully cricket)
भारतीय कर्णधार रोहित शर्माही पहिल्या गटासह इंग्लंडला रवाना होऊ शकतो. रोहितला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या घरच्या टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. यादरम्यान तो मुंबईत रस्त्यावर क्रिकेट खेळताना दिसला आहे.
रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो वरळीच्या रस्त्यावर स्थानिक लोकांसोबत गल्ली क्रिकेट खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावेळी तो फलंजादी करत मोठे शॉट्स मारताना दिसत आहे.
दरम्यान, रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चार्टर्डऐवजी व्यावसायिक विमानाने लंडनला जाणार आहे. बीसीसीआयने खेळाडूंना १५ जूनपर्यंत मुंबईत एकत्र येण्यास सांगितले आहे. त्याचवेळी दुसरा गट मुंबईऐवजी बेंगलोरवरुन निघेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटचा सामना बेंगलोरमध्ये खेळवला जाईल आणि त्यानंतर संघ पुढील सामन्यांसाठी इंग्लंडला रवाना होणारा आहे.
https://twitter.com/CricCrazyJ0hns/status/1536637759388979201?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1536637759388979201%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fsports%2Fcricket-news%2Findia-vs-england-rohit-sharma-playing-gully-cricket-at-woreli-ahead-england-tour-video-goes-viral-au487-1287660.html
रोहितशिवाय विराट कोहलीलाही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. रोहित आणि कोहलीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत संघाचे नेतृत्व करत आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी केएल राहुल जखमी झाला होता. त्यामुळे तो संघाबाहेर आहे.
पंतच्या नेतृत्वाखाली भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत. संघाला रोहित आणि कोहलीची उणीव भासत आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये पंतच्या अनेक निर्णयांवर प्रश्न उपस्थित झाले होते आणि आता त्याच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
दिपिका पदूकोनची तब्येत बिघडली; ह्रदयविकाराच्या त्रासामुळे तातडीने हाॅस्पीटलमध्ये केलं दाखल
गाढविनीच्या दुधापासून बनवलेले पनीर असते सोन्यापेक्षा महाग, किंमत वाचून चक्रावून जाल
‘या’ कारणामुळे पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी नाकारली? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं