Share

रोहित शर्माच्या मुलीच्या ‘त्या’ बोबड्या बोलाने जिंकली सर्वांची मनं;म्हणाली, डॅडाला कोरोला झालाय, तिथं फक्त…

इंग्लड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. विराट पाठोपाठ भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मालाही कोरोनाची लागण झाली आहे. टीम इंडियाला १ जुलैपासून इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी सामना खेळायचा आहे. रोहितला प्रॅक्टिस करणेही कठीण जात आहे. सध्या रोहित शर्मा आयसोलेशनमध्ये आहे. (rohit sharma daughter on rohit health)

अशात रोहितची तब्येत कशी आहे? त्याबाबत त्याच्या तीन वर्षाच्या मुलीने अपडेट दिली आहे. रोहितच्या मुलीचे नाव समायरा असे आहे. सध्या समायराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. यामध्ये चाहते समायराला तिचे वडील रोहितच्या प्रकृतीबद्दल विचारतात, तर हसत हसत समायरा तिचे वडील रोहितच्या प्रकृतीची माहिती देताना दिसते.

समायरा तिची आई रितिकासोबत हॉटेलच्या लॉबीमध्ये जात होती. यादरम्यान एका चाहत्याने रोहितची प्रकृती कशी आहे असे विचारले. यावर समायरा म्हणते, डॅडाला कोरोना झालाय. तो त्याच्या खोलीत झोपलेला आहे. खोलीत फक्त एका व्यक्तीला राहण्याची परवानगी आहे. ती यावेळी बोबडी बोलताना दिसत आहे.

https://twitter.com/Krishna19348905/status/1541428454050222081

समायराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रोहितचे चाहते समायराचे कौतूक करताना दिसत आहे. ती खुप क्युट आहे, असे रोहितचे चाहते म्हणताना दिसत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ८ लाखांपेक्षा जास्त लोकांनी बघितले आहे. तर २९ हजार लोकांनी लाईक केले आहे.

टीम इंडियाचे नेतृत्व करताना रोहित शर्माने अलीकडेच इंग्लंडचा क्लब लीसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळला होता. सामन्याच्या दुसऱ्या डावात रोहित शर्मा संघासोबत दिसला नाही. त्याने फलंदाजीही केली नाही. त्यानंतर बातमी आली की रोहित कोविड पॉझिटिव्ह झाला आहे. तेव्हापासून रोहित आयसोलेशनमध्ये आहे.

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध खेळला जाणारा हा एक कसोटी सामना गेल्या वर्षी झालेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेचा भाग आहे, ज्यामध्ये टीम इंडिया २-१ ने पुढे आहे. गेल्या वर्षी कोविड प्रकरणांमुळे शेवटची कसोटी होऊ शकली नाही, जी आता होत आहे. या कसोटीनंतर भारतीय संघाला तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय मालिकाही खेळायची आहेत.

महत्वाच्या बातम्या-
बंडखोर आमदाराने फेसबूक पोस्ट करत स्वत:लाच म्हटले गद्दार; वाचा नेमकी काय आहे पोस्ट
रोहित शर्माला कोरोना झाल्यानंतर कोण उचलणार संघाची जबाबदारी? प्रशिक्षकांनी केला मोठा खुलासा
काय सांगता? बाहुल्यासोबत लग्न केल्यानंतर महिलेने दिला बाळाला जन्म, फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now