यंदाच्या आयपीएल सिजनमध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी खुप खराब दिसून येत आहे. आता रविवारी मुंबईचा सामना लखनऊ सुपर जायंट्शी असणार आहे. या सिजनमध्ये त्यांना जर पहिला विजय मिळवायचा असेल, तर या सामन्यात त्यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. (rohit sharma changes team player)
या सिजनमध्ये मुंबईने आतापर्यंत सर्वच्या सर्व म्हणजेच ७ सामने गमावले आहेत. पाच वेळच्या आयपीएलची चॅम्पियन असूनही मुंबईला या सिजनमध्ये चांगले प्रदर्शन करता आले नाही. त्यामुळे ते पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे. आता कोणता चमत्काराच त्यांना प्लेऑफमध्ये पोहचवू शकतो.
अशात कर्णधार रोहित शर्माला कुठे गडबड सुरू आहे, हे कळत नसल्याचे दिसते. संघाच्या शेवटच्या सामन्यानंतर रोहित म्हणाला, ‘कुणाकडे बोट दाखवणे कठीण आहे, पण आम्ही सामन्याची सुरुवात चांगली करत नाहीये हे स्पष्ट आहे. जर तुम्ही लवकर विकेट गमावल्या तर नक्कीच मोठा स्कोर उभा करता येत नाही.
मुंबईच्या खराब कामगिरीचे एक कारण म्हणजे सलामीवीर रोहित आणि इशान किशनचा खराब फॉर्म. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध दोघांना खातेही उघडता आले नाही. रोहितने या स्पर्धेत आतापर्यंत ११४ आणि इशानने १९१ धावा केल्या आहेत. खराब फॉर्ममुळे त्यांना जास्त स्कोरही करता येत नाहीये.
गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आहे पण बाकीचे गोलंदाज अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. डॅनियल सॅम्सने चेन्नईविरुद्ध चार विकेट्स घेत चांगली कामगिरी केली, पण जयदेव उनाडकटला शेवटच्या षटकात १७ धावांचा बचाव करता आला नाही. त्यामुळे त्यांना सामना गमवावा लागला .
टायमल मिल्स, बेसिल थम्पी आणि मुख्य फिरकी गोलंदाज मुरुगन अश्विन यांनाही धावांचा बचाव करता आलेला नाही. ऑस्ट्रेलियाच्या रिले मेरेडिथ आणि हृतिक शोकीन यांनी गेल्या सामन्यात चांगला खेळ केला पण वानखेडे स्टेडियमवर लखनौच्या दमदार फलंदाजीवर मात करण्यासाठी मुंबईला अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने आता संघात काही बदल केले आहे.
लखनऊ विरुद्ध चांगली कामगिरी करण्यासाठी रोहितने ११ खेळाडूंची निवड केली आहे. अशी असेल मुंबई इंडियन्स संघाची प्लेईंग ११- इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, डॅनियल सॅम्स, जसप्रीत बुमराह, बेसिल थंपी
महत्वाच्या बातम्या-
कपिल शर्माने तो प्रश्न विचारताच भडकला अजय देवगण, म्हणाला, तुझ्यापेक्षा तर जास्तच नंबर..
अमरावतीत खळबळ! शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर अज्ञातांनी केला बेछूट गोळीबार
‘झेड दर्जाची सुरक्षा असणाऱ्याला पोलीस सुरक्षा देऊ शकत नसतील तर..’; सोमय्या हल्ल्या प्रकरणी फडणवीस संतापले.