भारत आणि वेस्ट इंडीजमधील टी-२० मालिकेला बुधवारपासून सुरूवात होणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका कोलकताच्या ईडन गार्डन ग्राउंडवर खेळली जाणार आहे. यापुर्वीच भारतीय कर्णधार रोहित शर्माने (rohit sharma) माध्यमांशी संवाद साधत सामन्यांविषयी चर्चा केली आहे. परंतु या चर्चेवेळीच रोहित शर्माला विराट कोहलीच्या (virat kohli) खराब फॉर्मवर प्रश्न विचारला असता तो चिडला असल्याचे समोर आले आहे. (rohit sharma angry on reporters on virat’s question)
माध्यांमाशी संवाद साधताना रोहितला विराट कोहलीविषयी प्रश्न विचारण्यात आला. परंतु त्या प्रश्नावर उत्तर देताना रोहित चिडला आणि म्हणाला की, तुम्ही गप्प बसाल तर सर्व काही ठीक होईल. तुम्ही लोक त्याला काही काळ एकटे सोडा, तो बरा होईल.
पुढे रोहित शर्मा म्हणाला की, विराट एक दशकाहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. जेव्हा कोणी एवढा वेळ क्रिकेट खेळत असेल, तेव्हा त्याला दडपण सहन करता येते. बाकी सर्व काही माध्यमांवर अवलंबून आहे. त्याला थोडा वेळ द्या, तो बरा होईल.”
इतकेच नव्हे तर यंदाच्या सामन्यांमध्ये सर्व खेळाडूंना संधी देण्यात येईल का, या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने सांगितले की, ”आमची योजना सर्व खेळाडूंची चाचणी घेण्याची आहे. विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना आम्हाला संधी द्यायची आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावण्यासाठी थोडा वेळ द्यायचा आहे.
अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. विश्वचषकापर्यंत कोण तंदुरुस्त असेल हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे आपल्याला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहावे लागेल. गेल्या काहि काळापासून विराट कोहली खेळात मागे पडताना दिसत आहे. त्याच्या अत्यंत खराब फॉर्मचा परिणाम सामन्यांवर होताना दिसत आहे.
विंडीजविरुद्धच्या तीन सामन्यांत तो ८, १८ आणि ० धावा करू शकला होता. त्यामुळे पुढील सामन्यात विराट नक्की कशी बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच रोहित शर्माने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे.
महत्वाच्या बातम्या
प्राजक्ता माळीची इच्छा झाली पूर्ण, ‘पावनखिंड’ चित्रपटात साकारणार ‘ही’ महत्वाची भूमिका, म्हणाली..
ही दोस्ती तुटायची नाय! एकाचवेळी निघाली तीन मित्रांची अंत्ययात्रा, निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
महाविकास आघाडी सरकारमध्ये बदल होणार, नाना पटोलेंच्या विधानामुळे राजकारणात खळबळ
संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरेंनी ‘या’ बड्या नेत्याला केला फोन, राजकीय वर्तुळात खळबळ






