Share

…तर राज्यातील माजी मंत्र्यांची सुरक्षा काढा, रोहित पवारांची गृहमंत्र्यांकडे मागणी

rohit pawar

पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल नुकतेच हाती आले आहे. या निवडणुकीमध्ये भाजपला दणदणीत विजय मिळाला असून कॉंग्रेसला मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे. तर दुसरीकडे पंजाबमध्ये भाजपला जबर धक्का बसला असून तिथे ‘आप’ने बाजी मारली आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी आपचे विजयी उमेदवार भगवंत मान हे विराजमान होणार आहेत. मात्र मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेण्याआधीच भगवंत मान यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेऊन सत्ता स्थापनाचा दावा केल्यानंतर एक मोठा निर्णय घेतला आहे.

भगवंत मान सरकार बनवण्याच्या आधीच पंजाबमधील सर्व १२२ माजी मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षा काढून घेण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर आता राज्यात देखील भगवंत मान यांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.

यामुळं पोलिसांवरचा ताण कमी होऊन विविध गुन्ह्यांच्या तपासाला मदत होणार असेल तर राज्यातही अशा प्रकारे नेत्यांच्या सुरक्षेचा फेरआढावा घेण्याबाबत विचार व्हावा, असा सल्ला रोहित पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे. सध्या राजकीय वर्तुळत रोहित पवारांच्या या ट्विटची जोरदार चर्चा आहे.

दरम्यान, भगवंत मान यांनी राज्यातील माजी मंत्री आणि माजी आमदार अशा १२२ जणांची सुरक्षा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं आहे, तर काहींनी टीका देखील केली आहे. पंजाबचे एडीजीपी सुरक्षा, चंडीगडच्या वतीने यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आलेत.

यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह त्यांची पत्नी नवज्योत कौर, मनप्रीत सिंग बादल, भारतभूषण आशु, रझिया सुलताना, परगट सिंग, राणा गुरजीत सिंग, सुखबिंदर सिंग सरकारिया, संजय तलवार, नथू राम, दर्शन लाल, धरमबीर अग्निहोत्री, अरुण नारंग, तरलोचन यांची सुरक्षा काढण्याचा निर्णय झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
आतंकवाद्यांना पाकच पुरवतो पैसा, त्यांना काळ्या यादीत टाका; अमेरिकन खासदाराने केली पोलखोल
जातीयवादी म्हणत ट्रोल करणाऱ्यांना नागराजने दिलं सर्वांची मनं जिंकणारं उत्तर; वाचून तुम्हीही कौतूक कराल
पृथ्वीराज चव्हाण नाही तर ‘हे’ वेगळंच नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी आलं समोर; वाचून धक्का बसेल
गुटखा तोंडात टाकला अन् तरूणासोबत होत्याचं नव्हतं झालं, औरंगाबादेतील घटनेनं गुटखा खाणाऱ्यांना धास्ती

 

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now