Share

अदानींचा ड्रायव्हर म्हणणाऱ्यांना रोहित पवारांनी सुनावलं; म्हणाले, आम्ही जे काही करतो, ते…

गुरुवारी राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, राज्य सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने बारामतीत सायन्स अँन्ड इनोव्हेशन ऍक्टिविटी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमाला उद्योगपती गौतम अदानी यांची प्रमुख उपस्थिती होती. (rohit pawar on bjp leaders)

या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळासह राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी एका प्रसंगाने हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला. शुक्रवारी अदानी यांना कार्यक्रम स्थळापर्यंत पोहचवण्यासाठी आमदार रोहित पवार हे त्यांची गाडी चालवताना दिसून आले सोशल मिडियावर हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. अनेकांनी त्यांना अदानींचा ड्रायव्हर म्हटले होते.

तसेच या फोटोवर राजकीय नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या होत्या. आता रोहित पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार नवी मुंबईत स्वराज्याचे पुनरागमन या नाटकाच्या प्रयोगाला उपस्थिती लावली होती. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता.

गाडी चालवण्याबाबत रोहित पवार म्हणाले, स्वच्छ मनाने मैत्री केली असेल, तर आम्ही जे काही करतो ते खुल्या पद्धतीने करतो. लपवून छपवून बाकी करतात. एखादा व्यक्ती आपल्या कार्यक्रमाला येत असेल आणि त्याच्यासाठी आपण गाडी चालवली तर त्यात गैर काय?

तसेच या घटनेवरुन भाजपचे लोक जे पतंग उडवताय. ते त्यांनी उडवू नये. त्यांना तेवढंच कळतं. गौतम अदानींची गाडी चालवत असेन आणि त्याची चर्चा होत असेल, तर ती चर्चा होऊद्या, असे म्हणत रोहित पवारांनी भाजप नेत्यांनाही टोला लगावला आहे.

दरम्यान, गौतम अदानींचे स्वागत करण्यासाठी रोहित पवार स्वत: विमानतळावर उपस्थित झाले होते. त्यानंतर रोहित पवारांनी अदानींचे स्वागत केले आणि गौतम अदानींना स्वत: गाडी चालवत विज्ञान केंद्रापर्यंत नेले. याच वेळी रोहित पवारांचे काही फोटो काढण्यात आले होते. जे सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे.

महत्वाच्या बातम्या-
पती राज कुंद्राला सोडून ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात पडलीये शिल्पा शेट्टी, स्वत:च खुलासा करत म्हणाली…
पठ्याचा नाद खुळा! पुण्याच्या शुभमला सर्वच विषयात ३५ गुण, पास झाल्यावर म्हणतो, मला अजून…
पुणेकर ऋतुराज गायकवाडने दाखवले पुणेरी गुण; खोडी काढणाऱ्या चहलची घेतली ‘अशी’ फिरकी, पाहा व्हिडीओ

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now