सिराजच्या गचाळ फिल्डींगवर प्रचंड भडकला रोहित, भर मैदानात डोळ्यांतून बरसली आग; व्हिडीओ व्हायरल

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील 3 वनडे मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे खेळवला जात आहे. या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय चांगलाच यशस्वी ठरताना दिसत आहे.

या सामन्यात टीम इंडियाने शानदार गोलंदाजी करताना न्यूझीलंडला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले आहे. मात्र याच दरम्यान वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कॅप्टन शर्मा मिस फिल्डिंगसाठी सिराजवर प्रचंड चिडला आहे.

मोहम्मद सिराजच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे हिटमॅन संतापला
टीम इंडियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार गोलंदाजी करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांची तारांबळ उडवली आहे. पण जेव्हा खेळाडू चांगली कामगिरी करत असतात आणि इतर खेळाडू चांगल्या क्षेत्ररक्षणात योगदान देत नाहीत, तेव्हा कर्णधाराला राग यायलाच हवा.

न्यूझीलंडच्या डावाच्या 16व्या षटकातही असेच काहीसे पाहायला मिळाले. जेव्हा हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता. त्याचं झालं असं की पंड्याने चेंडू फिलिप्सला टाकला आणि त्याने चेंडू मिड-विकेटच्या दिशेला मारला.

जिथे मोहम्मद सिराजला क्षेत्ररक्षक म्हणून तैनात करण्यात आले होते पण तो चेंडू नीट पकडू शकला नाही आणि चेंडू त्याच्यापासून दूर गेला. जिथे एक धाव व्हायला हवी होती तिथे फलंदाज पळून गेला आणि तीन धावा चोरल्या.

त्याच्या खराब क्षेत्ररक्षणानंतर कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापलेला दिसत होता. त्याची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हिडीओही तुम्ही पाहू शकता.

https://twitter.com/JunkieCricket/status/1616729175339184132?s=20&t=SG7Uco3y3oT0GMZfuCGjMw

रायपूरमध्ये खेळल्या जात असलेल्या पहिल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ केवळ 35 षटकेच खेळू शकला. या सामन्यात टीम इंडियाच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंड 108 धावांवर गारद झाला. ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 36 धावांची खेळी खेळली.

इतर कोणत्याही फलंदाजाला 30 चा आकडा पार करता आला नाही. दुसरीकडे, भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, त्याच्याशिवाय हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने 2-2 विकेट्स त्यांच्या खात्यात जमा केल्या. त्याचवेळी शार्दुल ठाकूर आणि कुलदीपने 1 फलंदाज बाद केला.

महत्वाच्या बातम्या
मॅच जिंकताच शार्दुलला मिठी मारायला धावला रोहीत, पांड्याची ब्रेसवेलला शाबासी; भारताचा सेलिब्रेशन व्हिडिओ तुफान व्हायरल
एकेकाळी होता बेरोजगार, आता Youtube वर कमावतो 8 लाख महिना; घेतली 50 लाखांची ऑडी