IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील रोमांचक 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना शनिवारी, 21 जानेवारी रोजी रायपूर येथे खेळला गेला. ज्यामध्ये भारताने आठ विकेट्सनी सहज विजय मिळवत न्यूझीलंडचा दारूण पराभव केला.
त्याचबरोबर या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिकाही जिंकली. भारतीय क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक विजयात मोहम्मद शमी आणि रोहित शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर चला जाणून घेऊया भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील घडामोडी सविस्तर.
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पुन्हा एकदा आपला क्लास दाखवला. त्याने आपल्या जबरदस्त गोलंदाजीने न्यूझीलंडच्या फलंदाजीला बॅकफूटवर ढकलले. शमी दुसऱ्या वनडेत उत्कृष्ट लयीत दिसला.
डावाच्या पहिल्याच षटकात किवी संघाचा घातक सलामीवीर फिन ऍलन क्लीन बोल्ड झाला आणि भारताला पहिली विकेट मिळाली. शमीने 6 षटकांच्या स्पेलमध्ये 3 च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करताना फिन ऍलन, डॅरिल मिशेल आणि मायकेल ब्रेसवेलच्या रूपाने 18 धावा देत 3 मोठे बळी घेतले. त्यामुळे न्यूझीलंडचा निम्मा संघ अवघ्या 15 धावांच्या एकत्रित धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
टीम इंडियाचा अनुभवी स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुसऱ्या वनडेत भारताच्या विजयाचा हिरो ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs NZ) पांड्याने बॅटने नव्हे तर गोलंदाजीने कहर केला.
न्यूझीलंडला 108 धावांवर रोखण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. 5 विकेट्स गमावल्यानंतर न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्स आणि मिचेल सँटनरची जोडी परतत होती. दोन्ही खेळाडूंमध्ये 47 धावांची भागीदारी झाली, तीही हार्दिकने मोडली.
पंड्याने 27 धावांच्या स्कोअरवर सँटनरला बॉलिंग करून डगआऊटचा रस्ता दाखवला. त्याने 6 षटकात 2.67 च्या इकॉनॉमीसह गोलंदाजी केली आणि 16 धावांत 2 मौल्यवान बळी घेतले. हे बळी फारच महत्वाचे होते. त्याने न्युझीलंडचे कंबरडे मोडले.
दुसऱ्या डावात 109 धावांचा पाठलाग करताना भारतीय क्रिकेट संघाने 20.1 षटकांत आठ विकेट्स शिल्लक असताना सहज लक्ष्य गाठले. ज्यात कर्णधार रोहित शर्माने स्फोटक फलंदाजी करताना महत्त्वाची भूमिका बजावली होती.
कर्णधार रोहित शर्माने अवघ्या 50 चेंडूत 51 धावांची स्फोटक खेळी खेळली. ज्यामध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. त्याचवेळी त्याचा जोडीदार शुभमन गिलनेही त्याला पूर्ण साथ दिली. गिलने आपला उत्कृष्ट फॉर्म सुरू ठेवत 40 धावांची नाबाद खेळी खेळली.
फिलिप्स शिवाय न्यूझीलंडच्या कोणत्याही फलंदाजाला 30 चा आकडा पार करता आला नाही. दुसरीकडे, भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, त्याच्याशिवाय हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने 2-2 विकेट्स त्यांच्या खात्यात जमा केल्या. त्याचवेळी शार्दुल ठाकूर आणि कुलदीपने 1 फलंदाज बाद केला.
महत्वाच्या बातम्या
कौटुंबिक अडचण सांगत सोडली मॅच अन् नंतर दिसला रोहीत पवारांसोबत; केदार जाधवच्या लबाडीचा कळस
एसटी महामंडळाच्या गाडीवर देवी-देवतांचे स्टिकर, नावं लावण्यास बंदी; शिंदे फडणवीस सरकारचे आदेश
पृथ्वी शॉचे गाऱ्हाणे साईबाबाने ऐकले, दिले श्रद्धा अन् सबुरीचे फळ! ३ वर्षांनी टिम इंडीयात निवड