हरीयाणाच्या अंबालामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे जय पब्लिक स्कूल अधोईचे शिक्षक आणि विद्यार्थी मानकी गावात असलेल्या H2O फन वॉटर पार्कमध्ये गेले होते. पण यावेळी एका झोक्यात झुलताना ग्रील तुटल्यामुळे एक महिला शिक्षक अपघाताला बळी ठरली आहे. (riya garg death in waterpark)
स्विंगची सुरक्षा ग्रील तुटल्याने शिक्षिका रिया गर्ग यांचा मृत्यू झाला, तर एक शिक्षिका आणि दोन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. जखमींना स्कूल बसने नेऊन एमएम रुग्णालयात दाखल केले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. तसेच मृत शिक्षकाचे वडील श्रावण गर्ग यांच्या तक्रारीवरून H2O फन वॉटर पार्कचे मालक गुरविंदर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जय पब्लिक स्कूल अधोई तर्फे शनिवारी सकाळी इयत्ता चौथी ते सातवी पर्यंतच्या १५० मुलांना माणका येथील H2O फन वॉटर पार्कमध्ये सहलीवर आणण्यात आले. याशिवाय पाच शिक्षकांवर मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
सर्व मुले आणि शिक्षक उद्यानात मजा करत होते. यादरम्यान अकराच्या सुमारास सहलीला आलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांनी फिरणे सुरू केले. त्यानंतर शिक्षिका आणि विद्यार्थीनी झोक्यात बसले, पण काही वेळातच झोक्यातील १२ क्रमांकाच्या बोगीचे सेफ्टी ग्रील तुटले. त्यामुळे बोगी अनियंत्रित झाली आणि दोन महिला शिक्षिका हिमानी (२५) आणि रिया गर्ग (२३) आणि विद्यार्थीनी कनिका (१२) आणि अभिका (१२) या सुमारे १५ फूट उंचीवरून खाली पडल्या. अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली.
सर्वांना स्कूल बसने रुग्णालयात आणण्यात आले, तेथे डॉक्टरांनी शिक्षिका रिया गर्ग यांना मृत घोषित केले. याशिवाय अन्य तीन जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कनिकाच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून तिला अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत.
या प्रकरणावर कॅरोसेल ऑपरेटर वेद प्रकाश सांगतात की, शिक्षिका रिया गर्ग कॅरोसेल स्विंग करताना सेल्फी घेत होती. त्यानंतर अचानक बोगीचे सेफ्टी ग्रील तुटल्याने हा अपघात झाला. दुसरीकडे, सेल्फी घेताना सेल्टी ग्रील तुटली कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच H2O फन वॉटरफॉल येथे झालेल्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाल्याची चौकशी करण्यात येत आहे, असे मुलाणा पोलिस स्टेशनचे प्रभारी सुभाष सिंह यांनी सांगितले.
जय पब्लिक स्कूल अधोईच्या प्राचार्या चेष्टा सलुजा यांनी शिक्षकाच्या सेल्फीला स्पष्टपणे नकार दिला आहे. फोटो काढण्यासाठी वेगळा फोटोग्राफर पाठवण्यात आल्याने रियाने कोणताही सेल्फी काढला नाही, असे त्या म्हणाल्या आहे. रियाच्या मृत्यूमुळे शाळा व्यवस्थापनात शोककळा पसरली आहे.
महत्वाच्या बातम्या-
दरोडेखोरांनी ४५ सेकंदात लुटले ३० लाख रुपये; पोलिसांनी पकडू नये म्हणून लढवली ‘ही’ भन्नाट शक्क्ल
बिनबुडाचे आरोप करुन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पीएसएलची बदनाम करु नको; आफ्रिदी फॉकनरवर संतापला
धक्कादायक! हातपाय बांधून, तोंडात बोळा कोंबून सुनेला सासरच्यांनी जिवंत जाळलं, कारण वाचून हादरा बसेल