प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या वेड चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. ३० डिसेंबरला रिलिज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला असून हा चित्रपट बक्कळ कमाई करत आहे. रितेशने या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण केले आहे.
जेनेलियाचाही हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. तिनेही खुप चांगला अभिनय या चित्रपटात केला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आहे. त्यामुळे अनेक किस्सेही समोर येत आहे. रितेश हा अभिनेता असला तरी तो राजकीय घराण्यातील आहे हे सर्वांनाच माहिती आहे.
रितेशचे वडील विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तर रितेशचा मोठा भाऊ अमित देशमुख आणि लहान भाऊ धीरज देशमुख हे दोघेही राज्याच्या राजकारणात सक्रीय आहे. घरात राजकीय वातावरण असतानाही रितेशने अभिनय क्षेत्राकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. आता रितेशने असे का केले होते हे त्याने स्वत:नेच सांगितले आहे.
मी माझे निर्णय स्वत: घेतो. पण इतरांच्या मतांचाही आदर करतो. मी राजकारण माझ्या भावांसाठी सोडले. माझे काम सिनेमांमध्ये काम करणे आहे. त्यामुळे मी तेच करत आहे, असे रितेश देशमुखने म्हटले आहे. तसेच त्याला राजकारणाबाबत आणखी एक प्रश्न विचारण्यात आला होता.
रितेश तु कधी सत्तेकडे आकर्षित झाला का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना तो म्हणाला की, मला सत्ता जास्त आकर्षित करत नाही. कारण मी आयुष्यभर सत्ता पाहिली आहे. मी माझ्या क्षेत्रात खुप आनंदी आहे आणि मला त्यातच काम करायला आवडते.
दरम्यान, वेड चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. त्याने अनेक रेकॉर्ड मोडले असून आतापर्यंत त्याने ४७ कोटी ६६ लाखांची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट ५० कोटींचा टप्पा पार करणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
शिक्षिकेने विद्यार्थ्यांना पाठवले स्वताचे नग्न फोटो, नंतर मुलांनी केलं असं काही की प्राचार्यालाही..
श्रीमंत लोकांच्या श्रीमंतीचं रहस्य उलगडलं, लाखो गुंतवून कमावतात करोडो, ‘या’ ठिकाणी लावतात पैसे
सिकंदरच्या कुस्तीचा निकाल देणाऱ्या पंचांना फोनवरून धमकी; सिंकदर शेख म्हणाला..