सोशल मीडियाच्या या युगात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्लॅटफॉर्मशी जोडली गेली आहे आणि कित्येक तास त्यावरच वेळ घालवायला लोकं पसंती देतात. पण काही वेळा हाच सोशल मिडीया लोकांच्या अडचणीचे कारण ठरू शकतो. असेच एक उदाहरण समोर आले आहे.
हे प्रकरण वाचून तुम्हीही डोक्याला हात लावाल. जिथे एका शाळेतील महिला शिक्षिकेने तिचे खासगी फोटो विद्यार्थ्यांना पाठवले. हे फोटो तिने ई-मेलद्वारे पाठवले होते. यासोबतच हे खासगी फोटो विद्यार्थ्यांच्या हाती लागताच काही विद्यार्थ्यांनी ते व्हायरलही केले.
यानंतर या प्रकरणाची माहिती मिळताच शाळेच्या मुख्याध्यापकांनीही सर्व विद्यार्थ्यांना पत्र पाठवले. मुख्यध्यापक म्हणाले की, ही घटना नकळत घडली आहे. त्यांनी सर्वांना ई-मेल डिलीट करण्याची आणि ते खासगी फोटो कोणाशीही शेअर करू नयेत, अशी विनंती केली.
तसेच शिक्षकाचे नावही उघड करण्यात आले नसून, कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात आल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली हे त्यांनी सांगितले नाही. यासोबतच त्यांनी पत्रात असंही लिहिलं आहे की, एका शिक्षिकेने नकळत सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठवला असून त्यात अश्लील फोटोंचाही समावेश आहे.
मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना असेही सांगितले आहे की, अनेक विद्यार्थ्यांनी चित्रे पाहिली आहेत आणि ती इतर लोकांसोबत शेअर केली आहेत. तरीही ते सर्वांना सांगू इच्छितात की, एक जबाबदार नागरिक म्हणून ई-मेलवर आलेली छायाचित्रे सोशल मीडियावर किंवा इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू नका.
यासोबतच एखाद्या विद्यार्थ्याला समुपदेशकाची मदत हवी असेल तर तोही घेऊ शकतो. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनीही तपास सुरू केला आहे. शिक्षकावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. पण मुख्यध्यापकांच्या म्हणण्यानुसार शिक्षीकेवर कारवाई करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
श्रीमंत लोकांच्या श्रीमंतीचं रहस्य उलगडलं, लाखो गुंतवून कमावतात करोडो, ‘या’ ठिकाणी लावतात पैसे
कुत्र्यापासून वाचला पण.., डिलीव्हरी बॉयसोबत घडलं भयानक, व्हिडीओ पाहून थरकाप उडेल
त्या व्यक्तीने पार्सलवर असा पत्ता लिहिला की डिलिव्हरी करणारी व्यक्ती मरेपर्यंत विसरणार नाही!
महाराष्ट्र केसरीत अन्याय झालेल्या सिकंदरने सोडले मौन; चाहत्यांना आवाहन करत म्हणाला आता यापुढे…