भारतीय संघाने तिसऱ्या टी २० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ४८ धावांनी पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम खेळ दाखवला. तसेच सलग दोन सामने हरल्यानंतर तिसरा सामना जिंकला त्यामुळे संपूर्ण भारतीय संघ खुश होता. (rishabh pant on indian team after win)
आता सामन्यानंतर भारतीय कर्णधार ऋषभ पंत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने संघातील खेळाडूंचे कौतूक केले. तो म्हणाला की, फलंदाज आणि गोलंदाज दोघांनीही चांगली कामगिरी केली. आम्हाला वाटले की आम्ही १५ धावांनी मागे आहोत, पण त्याबद्दल फारसा विचार केला नाही आणि गोलंदाजांनी त्यांचे काम चोख बजावले.
तसेच सामन्यात मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असते, त्यामुळे त्यांच्यावर दडपण असते. अशा सामन्यांमध्ये दडपण न घेता खेळल्यास चांगला निकाल मिळतो. पुढे बोलताना पंत म्हणाला की, गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. या सामन्यात युझवेंद्र चहलने तीन आणि हर्षल पटेलने चार विकेट घेतल्या.
तसेच ऋषभ पंतने कौतूक केले असले तरी तो खुप नाराज दिसत होता. तो म्हणाला की, ही चांगली कामगिरी नाही. आम्हाला चांगली सुरुवात मिळते पण आऊट झाल्यावर नवीन फलंदाज येताच वेगवान खेळणे कठीण जाते. पुढील सामन्यात चांगलं खेळण्याचा आम्ही प्रयत्न करु.
दरम्यान, इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड यांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी करून भारताच्या विजयाचा पाया रचला. या सामन्यात दोघांनी झंझावाती अर्धशतके केली. त्यांच्यामुळेच भारतीय संघ १७९ धावा करू शकला. इशान किशनने ५४ आणि ऋतुराज गायकवाडने ५७ धावा केल्या. त्याचवेळी भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड राखली आणि ठराविक अंतराने विकेट्स घेणे सुरू ठेवले.
भारतीय संघाने या मालिकेत प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारतीय संघाने तिसरा टी २० सामना ४८ धावांनी जिंकला. भारतासाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम खेळ दाखवला. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १८० धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे दक्षिण आफ्रिकेला गाठता आले नाही आणि संपूर्ण संघ १३१ धावांवर सर्वबाद झाला.
महत्वाच्या बातम्या-
हॉट मुलींच्या शोधात सुशांत सिंह राजपूत चक्क शेंगदाणे विकत होता, स्वतःच सांगीतला होता भन्नाट किस्सा
पुतिन यांचे बॉडीगार्ड त्यांची पॉटी आणि मुत्र पाठवतात रशियाला, वॉशरूमला गेल्यावर करत नाहीत फ्लश
किळसवाणे! पुतिन यांच्यासोबत बॉडीगार्डदेखील जातात वॉशरूमममध्ये, करतात ‘हे’ विचित्र काम