Share

ऋषभ पंतच्या जबरदस्त कामगिरीमुळे ‘या’ तीन स्टार खेळाडूंची लागली वाट; कारकिर्द संपण्याच्या मार्गावर

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत सध्या भारतातील सर्वोत्तम यष्टिरक्षक फलंदाजांपैकी एक आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर संपूर्ण भारतात पंतपेक्षा चांगला यष्टिरक्षक खेळाडू नाही. पण पंत व्यतिरिक्त भारतात असे अनेक यष्टिरक्षक आहेत ज्यांना संधी दिल्यास तेही कमाल दाखवू शकतात. पण पंतमुळे त्यांची कारकीर्द तरुण वयातच संपण्याच्या मार्गावर आहे. (rishabh pant destroy career this players)

ईशान किशन
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी दरवर्षी चांगली कामगिरी करणारा इशान किशन हा एक उत्तम युवा यष्टिरक्षक फलंदाज आहे. आयपीएल २०२० मध्ये त्याने केवळ १४ सामन्यांमध्ये ५७ च्या सरासरीने ५१६ धावा केल्या. २०२१ च्या सिजनमध्येही त्याने असेच काहीसे केले होते.

त्यानंतर त्याला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात संधी देण्यात आली. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इशान हा यष्टिरक्षक फलंदाजही आहे आणि त्याला पंतसोबत संघात संधी मिळणे खूप कठीण झाले आहे. त्याला सलामीवीर म्हणून नक्कीच संधी दिली जाते, पण रोहित शर्मा आणि केएल राहुलसारख्या खेळाडूंमुळे त्याला जास्त संधी मिळणे कठीण आहे.

संजू सॅमसन
संजू सॅमसन खूप चांगला फलंदाज आहे. अगदी तरुण असतानाही त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये ३ शतके झळकावली आहेत. पण पंत ज्या पद्धतीने फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे सॅमसनकडे दुर्लक्ष केले जाते. सॅमसनने आतापर्यंत भारतासाठी १० टी-२० सामने खेळले आहेत.

तसेच त्याने भारतासाठी एक वनडे सामना खेळला आहे. मात्र आतापर्यंत त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर फारशी कामगिरी करता आलेली नाही. पंत आपल्या फॉर्ममध्ये असाच राहिला तर सॅमसनची यष्टिरक्षक फलंदाज म्हणून कारकीर्द सुरु होण्याआधीच संपण्याची शक्यता आहे.

केएस भरत
आंध्र प्रदेशचा यष्टिरक्षक फलंदाज केएस भरतने ६९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३७.५८ च्या सरासरीने ३००० हून अधिक धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ८ शतके आणि २० अर्धशतके केली आहेत. एवढेच नाही तर त्याने त्रिशतकही ठोकले आहे. आयपीएल २०२१ मध्ये त्याचा आरसीबीच्या संघात समावेश करण्यात आला आणि त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय कसोटी संघातही स्थान मिळवले. असे असतानाही त्याल पंतमुळे त्याला पदार्पण करता आले नाही.

महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! गोव्यातील सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीलाही अटक
महेंद्रसिंग धोनी नंबर ७ ची जर्सी का घालतो? स्वत:च सांगितली जर्सीमागची इनसाईड स्टोरी
“शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही हे गोपीचंद पडळकरांना कळून चुकलं आहे”

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now