गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. राज्यातही बलात्काराच्या अनेक भयानक घटना घडत आहे. असे असताना आता ठाण्यातील उल्हासनगरमधून असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळे संपुर्ण शहरात खळबळ उडाली आहे. (riksha driver rape girl)
उल्हासनगर येथील एका अल्पवयीन मुलीवर रिक्षा चालकाने बलात्कार केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा आरोपी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत होता. हा प्रकार पीडित मुलीच्या आईवडिलांना समजताच त्यांनी त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच विठ्ठलवाडी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपी रिक्षा चालकाला अटक केली आहे. या नराधमाचे नाव दीपक हिवाळे असे आहे.
दीपक हिवाळे हा ३५ वर्षाचा असून त्याने अल्पवयीन मुली बरोबर ओळख बनवली होती. त्यानंतर आरोपीने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. मागील सहा महिन्यांपासून आरोपी रिक्षा चालक पीडित मुलीचे लैंगिक शोषण करत होता.
हा धक्कादायक प्रकार पीडित मुलीच्या आईवडिलांना समजला, त्यामुळे त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतल्यानंतर अवघ्या २४ तासाच्या आत आरोपीला त्याला अटक केली आहे. आता पोलिस त्याची चौकशी करत आहे.
दरम्यान, पुण्याच्या पिंपरी येथील एका २२ वर्षीय तरुणाने एका १३ वर्षीय मुलीला आपण पोलिस असल्याचे सांगत अश्लील व्हिडीओची मागणी केली होती. तसेच व्हिडिओ नाही पाठवल्यास मुलीच्या बहिणीला उचलून घेऊन जाण्याची धमकी दिली होती. धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपी तिथेच थांबला नाही, त्याने ते व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल केले होते.
महत्वाच्या बातम्या-
शेन वाॅर्नने १००० मुलींसोबत सेक्स केला पण फक्त ५ मुलींसोबत…; पुस्तकातून मोठा खुलासा
फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉनला टक्कर देतीये ‘ही’ कंपनी, ५०० रुपयांची वस्तु मिळतेय १०० रुपयांना
बीएसएफ जवान कॅप्टन कटप्पाने सहकाऱ्यांवरतीच केला गोळीबार, ५ जवानांचा मृत्यू, वाचा काय घडलं..