Share

लिलावात अनसोल्ड राहिला होता ‘हा’ खेळाडू, हार्दिक पांड्याने दाखवला विश्वास अन् गाजवले मैदान

ऋद्धिमान साहासाठी गेल्या दीड वर्षांचा प्रवास खुप खडतर होता. ऋषभ पंतच्या आगमनाने त्याची यष्टिरक्षकाची जागा हिरावून घेतली. त्याचवेळी संघ व्यवस्थापनाने त्याला सांगितले की, संघ आता पुढचा विचार करत आहे. इतकेच नाही तर ऋद्धिमान साहा ज्या संघासाठी अनेक सामने खेळला, त्या बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने त्याच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या सगळ्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे IPL 2022 च्या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी तो अनसोल्ड राहिला होता. ऋद्धिमान साहाने आता आपली व्यथा मांडली असून गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याचे कौतुक केले आहे. मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी साहा विकला गेला नव्हता.

तेव्हा गुजरात टायटन्स फ्रँचायझीने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला 1.9 कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात समाविष्ट केले. साहासाठी ती लाईफलाइन होती. जरी सुरुवातीला साहाला गुजरातसाठी फारशी संधी मिळाली नाही. यष्टीरक्षक म्हणून गुजरातची पहिली पसंती मॅथ्यू वेडला होती, ज्याने पहिले काही सामने खेळले होते.

फलंदाजीत तो स्वत:ला सिद्ध करू शकला नाही आणि कर्णधार हार्दिक पांड्याने साहावर विश्वास दाखवला. पांड्याने साहाला शुभमन गिलसोबत ओपनिंग करण्यास सांगितले. साहाला फक्त या संधीची गरज होती. पहिले पाच लीग सामने गमावल्यानंतर, साहाने 11 सामन्यांमध्ये GT साठी 317 धावा केल्या, ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

गुजरातने त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात आयपीएल जिंकल्यानंतर साहाने हार्दिक पांड्याला श्रेय दिले आणि सांगितले की त्याचा आत्मविश्वास परत आणण्यात त्याचे योगदान तो कधीही विसरू शकत नाही. साहाने बंगाली दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, हार्दिकने वेगवेगळ्या फ्रँचायझींनी सोडलेल्या सर्व खेळाडूंवर विश्वास दाखवला, ज्यांवर कोणीही विश्वास ठेवला नाही.

मी विकलो गेले नव्हतो आणि मला सुरुवातीला संधी मिळत नव्हती. त्यानंतर तो आला आणि म्हणाला की तुम्ही सलामीवीराची जबाबदारी घ्या. साहा म्हणाला की, हार्दिकच्या बोलण्याने माझा आत्मविश्वास परत आला. त्याने मला स्वत:ला सिद्ध करण्याची पूर्ण संधी दिली. त्याचे योगदान कधीही विसरता येणार नाही.

त्याच्या विश्वासाची परतफेड करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न केला. 37 वर्षीय साहा पुढे म्हणाला की, त्याने हार्दिकमध्ये मोठा बदल पाहिला आहे. हार्दिकला सगळ्यांना जपून कसे हाताळायचे हे माहीत आहे. मैदानात कोणी चुकी केली तरी त्याने सय्यम बाळगला. प्रत्येकाशी जोडलेले राहणे आणि त्यांचा खेळ समजून घेणे हे कर्णधाराचे काम असते.

महत्वाच्या बातम्या
..तर दादा कोंडके, निळु फुले, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ नायक होऊ शकले नसते- अशोक सराफ
नाटकात अशोक मामांसोबत घडला होता ‘हा’ भयानक प्रकार, तरी सुरु ठेवली तालीम; चिन्मयने सांगितला किस्सा
६ वीच्या मैत्रिणीसाठी केकेनं लिहीलं होतं ‘यारो दोस्ती’ गाणं अन् पुढे तिच…; केकेनं स्वत:च केला होता खुलासा
‘या’ पक्षाचा राज्यसभेसाठी मविआला पाठींबा जाहीर; शिवसेनेला दिलासा तर भाजपला झटका

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now