माजी दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नची आठवण काढताना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग खूपच भावूक झाला. वॉर्नला श्रद्धांजली वाहताना रिकी पाँटिंग रडू लागला. पाँटिंगच्या म्हणण्यानुसार, ही बातमी ऐकून त्याला खुप मोठा धक्का बसला आणि त्याचा अजूनही यावर विश्वास बसत नाही.
ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून जागतिक क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. रिकी पाँटिंगच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्याला ही बातमी समजली तेव्हा तो पूर्णपणे हादरला. त्याला अजिबात विश्वास बसला नाही.
पाँटिंग म्हणाला, इतर सर्वांप्रमाणे मलाही खूप आश्चर्य वाटले. सकाळी उठल्यावर मला मेसेज आला. मला माझ्या मुलीला नेटबॉलसाठी घेऊन जायचे होते. यानंतर ही बातमी ऐकल्यावर माझा अजिबात विश्वास बसेना. या बातमीवर विश्वास ठेवायला मला अनेक तास लागले. तो माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग होता.
गेल्या काही वर्षांत आम्ही अनेक संस्मरणीय क्षण एकत्र घालवले आहेत. ऑस्ट्रेलियातील प्रत्येक तरुण क्रिकेटपटूला त्याच्यासारखा धाडसी लेगस्पिनर व्हायचे होते. त्याच्यापेक्षा चांगला आव्हानात्मक गोलंदाज मी पाहिलेला नाही. त्याने फिरकी गोलंदाजीत नवीन प्रकारची क्रांती घडवून आणली होती.
शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियासाठी एकूण 145 कसोटी सामने खेळले आणि 708 विकेट्स घेतल्या. याशिवाय शेन वॉर्नने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 293 विकेट्स घेतल्या आहेत. जरी त्याला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही, परंतु तो वेगवेगळ्या T20 लीगमध्ये खेळला. रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली शेन वॉर्नने अनेक संस्मरणीय कामगिरी केली. ते दोघे खुप चांगले मित्र होते.
सध्या रिकी पॉन्टिंगचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. रिकी पॉन्टिंगला रडताना पाहून अनेक ऑस्ट्रेलियन चाहते पुन्हा एकदा भावूक झाले आहेत. शेन वॉर्नच्या अशा अचानक जाण्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट विश्वास दुखाचा डोंगर कोसळला आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडूंनीही त्याला श्रद्धांजली वाहिली.
https://youtu.be/Q96XCvpic8E
महत्वाच्या बातम्या
तारक मेहता का उलटा चष्माच्या सेटवर राडा, जेठालाल उर्फ दिलीप जोशी टप्पूवर भडकले, म्हणाले..
विदेशात डॉक्टरकीचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी भारतात होतात नापास, मोठी माहिती आली समोर
“केंद्रीय मंत्री सांगूनही आम्हाला पोलिसांनी सोडलं नाही, शेवटी अमित शहांना फोन करावा लागला”
‘फुटपाथवरली दहाबारा पोरं हे कॉम्बिनेशन नागराजने ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’नंतर.., किशोर कदमने व्यक्त केल्या भावना