Share

आज माझी मुलगी असती तर..; एकट्या राहणाऱ्या अभिनेत्री रेखाने का व्यक्त केली खंत? वाचा…

rekha

बॉलिवूडमध्ये रेखा यांचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. एककाळ असा होता की लोकांना त्यांच्याशिवाय दुसरी कोणती अभिनेत्री दिसतही नव्हती. त्यांनी आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. (rekha appriciate kangana ranaut)

रेखा यांनी २०१९ मध्ये कंगना राणावतबद्दल एक वक्तव्य केले होते. आता त्याबद्दल कंगणाने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे कंगणासोबतच रेखा या सुद्धा चर्चेत आल्या आहे. कंगनाने तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे.

कंगना राणावतने रेखा यांनी केलेल्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. २०१९ मध्ये मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान रेखाने कंगनाबद्दल सांगितले होते की, जर तिला मुलगी झाली तर ती कंगनासारखीच असती. याला उत्तर देताना कंगनाने ही तिची आजपर्यंतची सर्वात मोठी प्रशंसा असल्याचे म्हटले आहे.

२०१९ मध्ये मुंबईतील मराठी गौरव कार्यक्रमादरम्यान कंगना राणावतने रेखाला विशेष पुरस्कार दिला होता. त्यादरम्यान कंगणा रेखाने तिला गिफ्ट केलेल्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. पुरस्कार स्वीकारताना रेखाने कंगनाचे कौतुक केले होते.

कंगणावर तिचे खूप प्रेम असल्याचे सांगितले. ‘मला मुलगी असती तर ती कंगनासारखी असती’ असंही रेखा म्हणाली होती. अलीकडेच एका चाहत्याने रेखाचा हा जुना व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याच वेळी, कंगना राणावतने हा व्हिडि ओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर पुन्हा शेअर केला आणि लिहिले की माजी सर्वात मोठी प्रशंसा आहे.

कंगणा राणावतने २००६ मध्ये ‘गँगस्टर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. ती लवकरच तिच्या आगामी चित्रपट ‘तेजस’मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये कंगना भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now