सध्या रेखा ६७ वर्षांची असली तरी ती आजही ग्लॅमरस दिसते. रेखाने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तेलुगू चित्रपट ‘इंटी गुट्टू’मध्ये काम केले होते. तसेच १९६९ मध्ये प्रदर्शित झालेला अनजाना सफर हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. मात्र, सेन्सॉरशिपमुळे हा चित्रपट १० वर्षांनंतर प्रदर्शित झाला होता. (rekha 5 minute kiss)
रिपोर्ट्सनुसार, रेखा जेव्हा अवघ्या १५ वर्षांची होती, तेव्हा तिने अनजाना सफर चित्रपटाची शूटिंग सुरू केली होती. या चित्रपटातील अभिनेत्याने एका दृश्यात रेखाचे जबरदस्तीने चुंबन घेतल्याचे बोलले जाते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिचा सहकलाकार विश्वजित होता. एका सीनमध्ये त्याला रेखाचे चुंबन घ्यायचे होते पण तो तब्बल ५ मिनिटे रेखाला जबरदस्तीने किस करत राहिला. तिच्यासोबत घडलेल्या या घटनेमुळे रेखा सेटवरच रडली.
खरे तर रेखासाठी हा क्षण कोणत्याही लैंगिक छळापेक्षा कमी नव्हता. कारण तिला न कळवता एक अभिनेता तिला ५ मिनिटे किस करत होता. यासर उस्मान यांच्या रेखा: द अनटोल्ड स्टोरी या पुस्तकातही याचा उल्लेख आहे. या चित्रपटाच्या वेळी रेखा १५ वर्षांची होती. या चित्रपटात रेखा आणि विश्वजित यांना एका रोमँटिक गाण्यासाठी किसिंग सीन करायचा होता, ज्याबद्दल निर्मात्यांनी रेखाला काहीही सांगितले नव्हते.
रिपोर्ट्सनुसार, हा सीन रेखाला त्रास देण्यासाठी जाणूनबुजून ठेवण्यात आला होता. मात्र, सर्व काही तयार झाले आणि त्यानंतर दिग्दर्शक राजा नवाथे यांनी ऍक्शन म्हटले आणि अभिनेता विश्वजित यांनी रेखाला किस करायला सुरुवात केली. अशाप्रकारे तो जवळपास ५ मिनिटे रेखाला किस करत राहिला.
विश्वजीतने रेखाला किस करायला सुरुवात करताच तिला धक्काच बसला. कॅमेरा रोल चालूच राहिला पण या दरम्यान ना दिग्दर्शकाने कट सांगितले ना विश्वजीतने रेखाला किस करणे थांबवले. यावेळी रेखाने डोळे मिटले होते. पण त्या डोळ्यांतून अश्रू स्पष्ट दिसत होते. या किसिंग सीननंतर रेखा रडत होती. पण तिथे उपस्थित लोक टाळ्या वाजवत होते.
या दृश्यावर सेन्सॉर बोर्डानेही आक्षेप घेतला होता. या प्रकरणाचा वाद इतका वाढला होता की अमेरिकेच्या ‘लाइफ मॅगझिन’ने त्यावर ‘द किसिंग क्रायसिस ऑफ इंडिया’ अशी कव्हर स्टोरी प्रकाशित केली होती. या किसिंग सीनवर नंतर विश्वजीतने स्पष्टीकरण दिले होते आणि यात त्याने त्याची चूक नसल्याचे सांगितले होते. तो म्हणाला होता की, हे सर्व त्याने दिग्दर्शक राजा नवाथे यांच्या सांगण्यावरून केले होते.
महत्वाच्या बातम्या-
रश्मिका मंदानाने सांगितले कसा असेल तिच्या स्वप्नातील राजकुमार, ‘या’ असतील तिच्या अटी
तज्ञांच्या मते, ‘हे’ पाच शेअर्स विकत घेतले तर तुम्ही व्हाल मालामाल, अनेकांची आहे पहिली पसंती
संजू बाबाच्या हाती लागला मेगा प्रोजेक्ट, साकारणार भगवान शंकराची भूमिका, चाहते उत्सुक