कोल्हापुरातील दोन्ही खासदार शिंदेगटासोबत, जिल्हाप्रमुख ढसाढसा रडत म्हणाले शिवसैनिक माफ करणार नाहीत

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर कोल्हापूरमध्ये देखील शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.  शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.  यामुळे आणखी एक धक्का पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जबर बसला आहे.

याचबरोबर खासदार धैर्यशील माने यांनी देखील शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोल्हापुरात सध्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असल्याच बोललं जातं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शिवसेना खासदार शिंदे गटात सामील होणार आहे.

मात्र शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच आहेत. कोल्हापुरातील शिवसैनिक हे चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. ‘या दोन्ही खासदारांचा शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याचे कोल्हापूरच्या शिवसैनिकांनी म्हटले आहे.

याचबरोबर माध्यमांशी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना देखील आता अश्रु अनावर झाले आहेत. ‘उद्धव ठाकरे यांना संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी फसवलं आहे. ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, त्यामुळे कोल्हापूरची जनता आणि शिवसैनिक या दोघांना आता माफ करणार नाहीत,’ असं  पवार यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, ‘2024 ची लोकसभा निवडणुकीमध्ये कसे निवडून येतात तेच आम्ही पाहणार आहोत? असे देखील पवार म्हणाले. याचबरोबर मानेंचा इतिहास पाहता त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही, असले पोपट पक्षात घेऊ नका असे उद्धव ठाकरेंना विनंती करणार असल्याच पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या
तुम्ही घोटाळे करायचे, लफडी करायची अन् फाईल्स उघडल्या की पक्षप्रमुखांच्या नावाने..; ठाकरेंनी बंडखोरांना झापले
“युती केव्हाच झाली असती, उद्धव ठाकरेही तयार होते, पण…”, राहुल शेवाळे यांनी केला मोठा खुलासा
पुण्यातील इलेक्ट्रिक बाईक शोरूमला आग, ७ बाईक्स जळून खाक, ओव्हर चार्जिंगमुळे झाला घात
बेबी बंप लपवताना पती अभिषेकसोबत दिसली ऐश्वर्या, एवढी मोठी झालीये अराध्या, पहा व्हिडीओ