एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार बंडखोरीचा मुहूर्त हुकल्याने सर्व फुटलेले आमदार परतीच्या वाटेवर येऊ शकतात. शिंदे यांना २८ जूनच्या आतच हा बंड यशस्वी करायचा होता अशी माहिती मिळाली आहे. मुहूर्ताच्या आतच बंडखोर आमदारांमध्ये वादावादी सुरू झाल्याने हा बंड यशस्वी होणार नसल्याची चिन्हे आहेत.
महाविकास आघाडी तसेच शिवसेना मोठा बंडामुळे गुडघे टेकतील असा शिंदे यांचा अंदाज खोटा ठरला. उलट बंडखोरच कायद्याच्या कात्रीत सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे बंड आता इथच थांबवावे आणि परतीच्या वाटेला निघावे अशी स्थिती आमदारांमध्ये निर्माण झाली आहे.
फुटीर आमदारांना फक्त ३ दिवस बाहेर थांबावे लागेल असे सांगण्यात आले होते. पण त्यानंतर पाच दिवस झाले तरी सत्तास्थापनेची काहीच चिन्हे दिसत नसल्याने आमदारांमध्ये वाद सुरू झाला अशी माहिती सुत्रांकडून आली होती. त्यानंतर आता पुन्हा एक अशीच बातमी समोर आली आहे.
मंत्रीपदासाठी या आमदारांमध्ये वादवादी झाली आहे. सोशल मिडीयावर चर्चा आहे की जळगावमधील दोन बंडखोर आमदार गुवाहाटीमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये भिडले. मंत्रीपदावरून या दोघांमध्ये वाद झाला असल्याची चर्चा आहे. गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये बंडखोर आमदारांच्या चर्चा तसेच संवाद सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
सांगोला येथील आमदार शहाजी पाटील यांचा संवाद तर पुर्ण राज्याने ऐकला आहे. त्यावरून आता अनेक नेते त्यांची खिल्ली उडवत आहेत. त्यानंतर आता या पंचतारांकित हॉटेलमध्ये वाद झाल्याची चर्चा बाहेर येत आहे. मुंबईत परतल्यावर कोण मंत्री होणार? यावरून आमदारांमध्ये राडा झाला आहे.
जळगावमधील हे आमदार आहेत. त्यांच्यामध्ये हाणामारी झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याची एक पोस्ट जळगाव जिल्ह्यात सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा वाद नेमका कोणत्या दोन आमदारांमध्ये झाला आहे याची माहिती अदयाप मिळालेली नाही. या पोस्टची सत्यता त्यामुळे कळू शकली नाही.
ऍड. जयेश वाणी यांनी पोस्ट केली आहे की,मंत्री पदावरून आसामात राडा…कोण होणार मुंबईत परतल्यावर मंत्री या मुद्द्यावरून जळगाव जिल्ह्यातले दोन आमदार एकमेकांशी भिडलेत. पार हातापाई झाली अशी सुत्रांची माहिती आहे, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
मंत्री पदावरुन आसामात राडा…
कोण होणार मुंबईत परतल्यावर मंत्री या मुद्द्यावरुन जळगाव जिल्ह्यातले दोन आमदार एकमेकांशी भिडलेत पार हातापाई झाली अशी सुत्रांची माहिती.— Adv.Jayesh Wani – अॅड.जयेश वाणी (@jayeshwani) June 25, 2022