सध्याच्या काळातील सर्वात मोठे भारतीय खेळाडू म्हणजे महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे आहे. धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्त झाला असला तरी तो अजूनही आयपीएल खेळताना दिसतो. तसेच धोनी नंतर भारतीय संघाची धुरा विराटने आणि विराट नंतर आता रोहित सांभाळताना दिसत आहे. (reason behind rohit sharma jersey number 45)
धोनी, विराट आणि रोहित त्यांच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत राहतात. आतापर्यंत तिघांनीही अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केलेले आहे. त्यामुळे त्या तिघांच्या चाहत्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. त्यांच्या अनेक गोष्टींबद्दल त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायला आवडत असते.
आज आपण त्यांच्या जर्सीबद्दल बोलणार आहोत. धोनी ७ नंबरची जर्सी घालतो. विराट नंबर १८ ची जर्सी घालतो आणि रोहित शर्मा ४५ नंबरची जर्सी घालतो. कदाचित तुम्हाला माहित नसेल की यामागेही एक कारण आहे. ते कारणही खुप खास आहे. आज आपण तेच जाणून घेणार आहोत.
1) विराट कोहली-१८
विराट कोहली हा त्याच्या वडिलांच्या खूप जवळ होता हे आपणा सर्वांना माहीत आहे. विराटच्या या यशामागे त्याच्या वडिलांचा मोठा हात होता. विराट देशांतर्गत क्रिकेट खेळत असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. विराट कोहलीने टीम इंडियासाठी पदार्पण केले तेव्हा त्याने १८ नंबरची जर्सी घातली होती कारण त्याच्या वडिलांचे १८ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले होते. म्हणूनच तो ही जर्सी घालतो.
२) महेंद्रसिंग धोनी- ७
धोनीची ही जर्सी खूप प्रसिद्ध झाली आहे. ही जर्सी मिळवण्यासाठी चाहते कोणत्याही थराला जाऊ शकतात. धोनी नेहमी ७ नंबर ला स्वतःसाठी लकी मानतो. खरंतर धोनीचा वाढदिवस वर्षाच्या ७ व्या महिन्यात म्हणजे जुलैमध्ये ७ तारखेला असतो. म्हणूनच तो ही जर्सी घालतो.
३) रोहित शर्मा-४५
रोहित ४५ नंबरची जर्सी का घालतो, याचा खुलासा त्यानेच केला होता. खरंतर जेव्हा रोहित अंडर-१९ टीमसोबत वर्ल्ड कप खेळणार होता तेव्हा त्याच्या आईने त्याच्यासाठी हा नंबर निवडला होता. ही जर्सी रोहितसाठी खूप लकी होती आणि तेव्हापासून तो या नंबरची जर्सी घालूनच मैदानात उतरतो.
महत्वाच्या बातम्या-
राज्यातील भोंग्यांच्या वादात आता सोनू सूदची उडी; राज ठाकरेंच्या भूमिकेवर म्हणाला, हनुमान चालिसा…
प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या भिडे गुरुजींवर मुस्लीम डॉक्टराने केले उपचार; स्वत:चा पुरस्कार सोहळा केला रद्द
अक्षया देवधरच्या साखरपुड्याच्या पोस्टवर तिच्या एक्स बॉयफ्रेंडने केली कमेंट, म्हणाला…