राज्यात सध्या वेगवेगळ्या मुद्यावरुन राजकारण सुरु आहे. राष्ट्रवादीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीयवादाचा आरोप केला होता. हा वाद सुरु असतानाच आता या जातीयवादाच्या वादात आणखी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. (reason behind mahasangh dont want meet sharad pawar)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्राम्हण महासंघाने भेट नाकारली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि छगन भुजबळ यांनी एक वक्तव्य केले होते. त्यावर ब्राम्हण महासंघाने आक्षेप घेतला होता.
शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे अमोल मिटकरी आणि छगन भुजबळांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे, असा आरोप ब्राम्हण महासंघाने केला आहे. त्यामुळे त्यांनी पवारांची भेट नाकारली आहे. यामुळे राज्यात आणखी एक वाद निर्माण होताना दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे राष्ट्रवादी आणि शरद पवार जातीयवादाचे राजकारण करत असल्याचे गंभीर आरोप करताना दिसून येत आहे. अशातच ब्राम्हण महासंघाची नाराजी पुढे आल्याने पुन्हा उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहे. आता ब्राम्हण महासंघाच्या या भूमिकेवर राष्ट्रवादीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ब्राम्हण महासंघाने शरद पवारांची भेट नाकारली आहे, त्यांची ही भूमिका योग्य नाही, असे राष्ट्रवादीने आता म्हटले आहे. ब्राम्हण महासंघाची एखाद्या गोष्टीबाबत नाराजी असती तर चर्चा करता आली असती. त्यासाठी त्यांना भेटीसाठी बोलावलं होतं. मात्र त्यांनी ती भेट नाकारली, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
ब्राम्हण समाजाची ही भूमिका योग्य नाहीये. चर्चेतून मार्ग निघाला असता. त्यांनी टोकाची भूमिका न घेता शरद पवार यांची भेट घ्यावी. या भेटीतून मार्ग निघेल. शेवटी जे काही झालं त्याबाबत त्यांची काय भूमिका होती यावर चर्चा होणार होती. हाच पवारांचा हेतू होता, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पवारांना भेट नाकारणं ही आदर सन्मान ठेवून घेतलेली भूमिका आहे. आमच्या वेदना आम्ही सांगण्यापेक्षा पवारांना आधीपासूनच त्याबाबत कल्पना आहे. आमच्या काय तक्रारी असायला हव्या हे पवारांना आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे, असे ब्राम्हण महासंघाने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘रानबाजार’मधल्या बोल्ड दृश्यांमुळे तेजस्विनी ट्रोल; तेजस्विनीच्या आईने टीका करणाऱ्यांनाच झापले
‘तुझं नेमकं चाललय तरी काय?’; ‘रानबाजार’च्या बोल्ड भूमिकेनंतर ‘त्या’ फोटोवरून प्राजक्ता पुन्हा निशाण्यावर
‘ते दंगल घडवून आणणार नाहीत याची काळजी घ्या’, मोहन भागवतांच्या दौऱ्याबाबत मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना आवाहन