Share

५ मिनीटांत ५० टक्के चार्ज होणारा मोबाईल लवकरच भारतात होणार लाॅंच; फिचर्स वाचून खूष व्हाल

Realme ने अलीकडेच चीनमध्ये Realme GT २ सिरिज लॉन्च केली आहे. या सिरिजमध्ये Realme GT २ आणि Realme GT २ प्रो या दोन स्मार्टफोनचा समावेश आहे. Realme GT सिरिज गेल्या वर्षी भारतात लॉन्च झाली होती. कंपनीने भारतात स्मार्टफोन्सच्या लॉन्चची तारीख अद्याप जाहीर केली नसली तरी कंपनीने नवीन ट्विटर पोस्टसह Realme GT २ सीरिजच्या लॉन्चचा टीजर रिलिज केला आहे. (realme gt 2 pro launch in india)

कंपनीने ट्विट केले आहे की, प्रतिक्षा संपली! भारतात लवकरच लाँच होतोय #GreterThanYouSee. त्यामध्ये Realme GT २ प्रो आणि Realme GT २ ची फिचर्स सांगण्यात आले आहे. Realme GT 2 प्रो स्मार्टफोन हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे जो बायो-आधारित मटेरियलपासून डिझाइन केला गेला आहे.

या फोनमध्ये ६.७ इंचाचा OLED डिस्प्ले आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon ८ जनरेशन १ चिपसेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये १२ जीबी पर्यंत रॅम आणि ५१२ जीबीपर्यंत इंटरनल मेमरी आहे. कंपनी चीनमध्ये त्याचे ४ प्रकार विकते. ज्यामध्ये ८ जीबी+ १२८ जीबी, ८ जीबी + २५६ जीबी, १२ जीबी + २५६ जीबी आणि १२ जीबी + ५१२ जीबी या व्हेरिएंटचा समावेश आहे.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यात ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यात ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, ५० मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि ३ मेगापिक्सेलचा मायक्रोस्कोप कॅमेरा आहे. तर यात ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच वेळी, यात पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची बॅटरी आहे, जी ६५ व्हॅटचे चार्जर सपोर्ट करते. हा फोन ५ मिनिटांत ५० टक्के चार्ज होतो, असा दावा कंपनीने केला आहे.

तसेच Realme GT २ मध्ये ६.६२ इंचाचा OLED डिस्प्ले आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 888 चिपसेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटरनल मेमरी आहे. कंपनी चीनमध्ये त्याचे ४ प्रकार विकते. ज्यामध्ये ८ जीबी + १२८ जीबी, ८ जीबी+ २५६ जीबी आणि १२ जीबी + २५६ जीबी या व्हेरिएंटचा समावेश आहे.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यात ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यात ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, ५० मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि ३ मेगापिक्सेलचा मायक्रोस्कोप कॅमेरा आहे. त्याच वेळी, यात ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर यात पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची बॅटरी आहे, जी ६५ व्हॅटचे चार्जर सपोर्ट करते.

महत्वाच्या बातम्या-
‘देवमाणूस’मधील ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता अजूनही चालवतो रिक्षा, कारण वाचून डोळे पाणावतील
ठाकरे सरकारने जारी केले होळीचे नियम; जाणून घ्या काय आहे सूचना, नाहीतर होईल कडक कारवाई
विवेक अग्निहोत्रींचे रोखठोक मत; ‘जर तुमच्या भावाची हत्या आणि बहिणीवर बलात्कार झाला असता तर…’

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now