मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांनी त्यांची पत्नी मेलिंडा फ्रेंचला घटस्फोट दिला. २७ वर्षानंतर मे २०२१ मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या घटस्फोटावर मेलिंडा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता कित्येक महिन्यानंतर त्यांनी यावर भाष्य केले आहे. (real reason behind bill gates divorce)
मेलिंडा गेट्स यांनी बिल गेट्स यांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल बोलले. त्यांनी सांगितले की त्यांनी बिलला यासाठी माफ केले आहे, कारण मी माफ करण्यावर विश्वास ठेवते. तसेच काही काळानंतर आमच्या नात्यात असे काहीही राहिले नाही जिथे ते जोडपे म्हणून आम्ही एकत्र आयुष्य घालवू शकवू.
मेलिंडा गेट्स यांनी सीबीएस न्यूजच्या एका शोमध्ये मुलाखत दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी बिल गेट्सच्या विवाहबाह्य संबंधाविषयी सांगितले, मी निश्चितपणे माफ करण्यावर विश्वास ठेवते, पण मला वाटले की आम्ही आमचे नाते पुन्हा जुळून आले नाही पाहिजे. त्यांचे विवाहबाह्य संबंध होते, त्यामुळे आमच्यातील दुरावा वाढत चालला होता. त्यामुळे मी घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला होता.
मेलिंडापासून घटस्फोटाच्या घोषणेनंतरच बिलच्या प्रवक्त्याने बिल गेट्सच्या २७ वर्षीय विवाहबाह्य संबंधाची माहिती दिली होती. बिल गेट्स यांचे हे अफेअर मेलिंडासोबतच्या लग्नातच सुरू झाले होते. मेलिंडा पुढे म्हणाली, आमच्यात घडलेले हे एक कारण किंवा एकमेव गोष्ट नव्हती. एक वेळ अशी आली जेव्हा आमच्यात काहीही राहिले नाही आणि मला वाटले की ते योग्य नाही.
मेलिंडाने सांगितले की, जेव्हा ती बिलपासून वेगळी झाली तेव्हा ती अनेक दिवस खूप रडली. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट गमावता जी तुम्हाला आयुष्यभर तुमच्यासोबत राहील असे वाटले तेव्हा तुम्हाला दुःख होते. आता ती त्या दुःखातून बाहेर येत आहे आणि आयुष्यात पुढे जात आहे. तिने सांगितले की तिला असे वाटते की, आता ती जीवनाची दुसरी बाजू पाहण्याचा प्रयत्न करत आहे .
मे २०२१ मध्ये, बिल आणि मेलिंडा यांनी त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली आणि सांगितले की, खूप विचारविनिमय केल्यानंतर, आम्ही आमचे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्याचवेळी दोघांनीही सांगितले होते की, ते त्यांच्या चॅरिटेबल फाउंडेशन बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनमध्ये एकत्र काम करत राहतील.
महत्वाच्या बातम्या-
युक्रेनमधील विद्यार्थ्यांची मोदींनी घेतली भेट; म्हणाले, याला आम्ही नाही तर आधीची सरकारेच जबाबदार
…तरच आम्ही तिघी तुझ्याशी लग्न करु; तरुणींनी ठेवली तरुणासमोर अजब अट, त्यानेही मान्य करुन केले लग्न
कांदा कापताना आईच्या डोळ्यातून येत होते अश्रू, ते थांबवण्यासाठी सातवीच्या ओंकारने केली स्मार्ट चाकूची निर्मिती