अनाथांची माय म्हणून ओळख असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं काल रात्री पुण्यातल्या गॅलक्सी रूग्णालयात निधन झालं. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईंनी महाराष्ट्रात अनाथाश्रम स्थापन केले. सिंधुताई यांनी अनाथ मुलांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला. सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहेत.
आज सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या मृत्यचे खरे कारण समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच सिंधुताई यांच्यावर गॅलेक्सी रुग्णालयात हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सिंधुताईंच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र काल अचानक छातीत दुखू लागल्यामुळे सिंधुताईंना पुन्हा एकदा गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रुग्णालयातच उपचार सुरु होते. मात्र काल रात्री ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने सिंधुताईंचा ८ वाजून ४० मिनिटांनी मृत्यू झाला.
सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज पुण्यात शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली देताना, “सिंधुताईंच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली”, असे ट्विट केले आहे. महाराष्ट्र्रातील आणि देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सिंधुताईंना श्रद्धांजली दिली आहे.
सिंधुताईनां लोक प्रेमाने माई म्हणत असंत. सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून सिंधुताईंचे नाव चिंधी ठेवले होते. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी होती. सिंधुताई फार हुशार होत्या,पण तरी त्यांना जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले.
अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला.
येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही या संस्थेकडूनच केले जाते.
महत्वाच्या बातम्या :-
‘माझ्या मुलाची इच्छा होती की योगींनी मुख्यमंत्री व्हावे, कोरोनाने मुलगा हिरावला पण योगींचा फोनही नाही आला’
विकी-कतरिनानंतर ‘या’ बाॅलीवूड जोडप्याच्या लग्नाची चर्चा; नवरी आहे मराठमोळी तर नवरदेव…
हेच का ‘सब का साथ?’ शेकडो महिलांच्या ऑनलाईन लिलावावरून जावेद अख्तरांचा मोदींना सवाल