Homeताज्या बातम्याविकी-कतरिनानंतर 'या' बाॅलीवूड जोडप्याच्या लग्नाची चर्चा; नवरी आहे मराठमोळी तर नवरदेव…

विकी-कतरिनानंतर ‘या’ बाॅलीवूड जोडप्याच्या लग्नाची चर्चा; नवरी आहे मराठमोळी तर नवरदेव…

सिनेसृष्टीत सध्या लग्नसराई सुरु आहे. एकामागून एक असे अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकताना पाहायला मिळत आहेत. या सेलिब्रिटींचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यादरम्यान आता बॉलिवूडमधील आणखी एक जोडपे लग्नबेडीत अडकण्यास तयार आहेत. हे जोडपे म्हणजे अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर आणि त्याची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर. समोर येत असलेल्या बातम्यांनुसार ते दोघे यावर्षी मार्चमध्ये लग्न करू शकतात.

रिपोर्टनुसार फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर मार्च २०२२ मध्ये मुंबईत लग्न करण्याची योजना करत आहेत. सुरुवातीला ते दोघे त्यांचा शाही विवाहसोहळा करण्याचा विचार करत होते. मात्र, कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे ते मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नसमारंभ करण्याचे त्यांनी ठरवले.

View this post on Instagram

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar)

त्यानुसार फरहान आणि शिबानी त्यांच्या लग्नसोहळ्यासठी मुंबईतील एक फाईव्ह स्टार हॉटेल बुक केला आहे. तर विवाहसोहळ्यासाठी त्यांनी सब्यसाचीद्वारे डिझाईन करण्यात आलेल्या कपड्यांची निवड केली आहे. तसेच लग्नासंबंधित इतर तयारीसुद्धा पूर्ण झाली असून या विवाहसोहळ्यास दोघांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्र मंडळींना बोलावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

शिवानीसोबतच्या नात्यापूर्वी फरहानने २००० साली अधुना भभानीसोबत पहिलं लग्न केलं होतं. मात्र, लग्नाच्या १६ वर्षांनंतर त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०१६ साली त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना शाक्य आणि अकीरा नावाच्या दोन मुलीही आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar)

दरम्यान, फरहान आणि शिबानी दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. रिपोर्टनुसार ते दोघे लिव्ह-इन मध्येसुद्धा राहत आहेत. दोघेही नेहमी एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसून येतात. तसेच कोणत्याही कार्यक्रमात ते दोघे एकत्र दिसून येतात. सोशल मीडियावरही ते दोघे नेहमी एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात.

महत्त्वाच्या बातम्या : 

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ने तोडला ‘KGF’ चा रेकॉर्ड, १३ दिवसात कमावले तब्बल एवढे कोटी
‘बिग बॉस’ फेम सोनाली पाटीलचे इन्स्टाग्रामवर झाले २००K फॉलोअर्स; पोस्ट शेअर करत चाहत्यांचे मानले आभार
नवीन वर्षाच्या निमित्ताने ईशा गुप्ता झाली रोमॅंटिक; बॉयफ्रेंडसोबतचे लिपलॉकचे फोटो झाले व्हायरल

ताज्या बातम्या