Share

मेहुण्याची चौकशी बंद करण्यासाठीच ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला; समोर आला मोठा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray Sad

गेल्या काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले. यादरम्यान मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतली. तेव्हापासून ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील शाब्दिक युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये.

नुकतेच उद्धव ठाकरे यांनी मालेगाव सभेदरम्यान नाव न घेता शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्यावर टीक केली‌. ते म्हणाले, तुम्ही म्हणता कांद्याला भाव मिळाला, मी म्हणातो, कांद्याला भाव मिळाला. गेल्यावर्षी एका कांद्याला भाव मिळाला. एक कांदा ५० खोक्याला विकला गेला.

उद्धव ठाकरे यांच्या या टिकेवर सुहास कांदे यांनी प्रतिक्रिया देत गौप्यस्फोट केला. सुहास कांदे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी जनतेसाठी नाही तर श्रीधर पाटणकर यांची चौकशी होऊ नये म्हणून राजीनामा दिला आहे, असे म्हणत कांदे यांनी खळबळजनक आरोप केला. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

तसेच, पुढे बोलताना त्यांनी त्यांची नोर्को टेस्ट करण्याची मागणी केली. ते म्हणाले, नोर्को टेस्ट करा म्हणजे हे सगळं सत्य बाहेर येईल. त्यांनी किती लोकांना फोन केले. किती लोकांना मध्यस्थी केली, राजीनामा देण्यापूर्वी याचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यामुळे या काॅन्ट्रॅक्टरकडून आपण किती खोके घेतले यांची देखील चौकशी करा.

यादरम्यान, उद्धव ठाकरेंची सभा फक्त टिका टिपणी करण्यासाठी होती. या सभेत तरुणांचे कोणतेही नेतृत्व केले नाही. ही सभा शेतकऱ्यांना दिशा देणारी नव्हती. सभा पाहून बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मला उद्धव ठाकरे यांची दया आली, असेही सुहास कांदे म्हणाले. तसेच, उद्धव ठाकरे यांना माझी विनंती आहे की, आता त्यांनी आपले भावनेचे राजकारण बंद करावे.

त्याचवेळी, मी उद्धव ठाकरे यांना आव्हान करतो की, आम्ही खोका सोडा एक रुपया घेतला असेल तर आमची नार्को टेस्ट करा. ती सुद्धा जाहीरपणे कॅमेरे लावून टेस्ट करा. ज्यांनी बाळासाहेबांना शिव्या दिल्या, त्याच भुजबळांच्या मांडीला मांडी लावून उध्दव ठाकरे बसले. मग आम्ही कोणाकडे पाहायचे? असा सवाल कांदे यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या
हरमनचे हास्य, अंबानींची गर्जना, झुलनची मिठी, WPL जिंकल्यानंतरचा मुंबईचा सेलिब्रेशन Video Viral
मुंबई इंडीयन्सने जिंकली पहीली WPL ट्रॉफी; श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात दिल्लीला हरवले
तुमची ५२ काय १५२ कुळं खाली आली तरी ठाकरेंपासून शिवसेनेला कुणीही तोडू शकत नाही’

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now