Share

IPL 2022: RCB ची मोठी घोषणा, विराटच्या जागी ‘या’ खेळाडूकडे दिली संघाची कमान, चाहत्यांना धक्का

आयपीएल सुरू होण्याच्या 14 दिवस आधी रॉयल चॅलेंजर्सने त्यांच्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. आरसीबीने दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसकडे संघाची कमान सोपवली आहे.आयपीएलचे जेतेपद एकदाही काबीज करू न शकलेल्या बंगळुरूला या हंगामात मोठ्या आशा आहेत.

आता फॅफला आरसीबी चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरावा लागेल. दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेल हे देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत असल्याचे सांगितले जात होते. पण फॅफने बाजी मारली असून तो आता संघाची कमान सांभाळणार आहे. विराट कोहलीच्या चाहत्यांना हा खुप मोठा धक्का आहे यात शंका नाही.

विराट कोहलीने इतकी वर्षे आरसीबीचे कर्णधारपद भूषविले होते पण आता त्याला या संघाच्या कर्णधारपदावरूनही पायउतार व्हावे लागणार आहे. फाफ डू प्लेसिसच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने आतापर्यंत 100 आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 34.94 च्या सरासरीने 2935 धावा केल्या आहेत.

याशिवाय त्याने आयपीएलमध्ये 22 अर्धशतके झळकावली आहेत आणि त्याची सर्वोत्तम फलंदाजी आयपीएल धावसंख्या 96 आहे. गेल्या आयपीएल हंगामापर्यंत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळलेला डू प्लेसिस आता नव्या जर्सी आणि संघासोबत दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आणि त्याचा आधीच्या संघातील विश्वासू सहकारी खेळाडू एमएस धोनी आता त्याच्याविरुद्ध खेळताना आणि कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.

फाफ डू प्लेसिसने IPL 2021 मध्ये शानदार फलंदाजी करताना 600 हून अधिक धावा केल्या. त्याने अनेक प्रसंगी चेन्नईला जिंकून दिले आहे आणि गरज असेल तेव्हा संघाला दाखवून दिले आहे की त्याच्यात किती दम आहे. त्याच्या याच कामगिरीमुळे कदाचित त्याला आरबीसीने कर्णधारपद देण्याचा निर्णय घेतला असावा.

अशा अनेक कारणांमुळे आरसीबीने फाफ डू प्लेसिसवर विश्वास व्यक्त केला. फाफला बंगळुरूने 7 कोटींना विकत घेतले. फॅफने यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले आहे. फॅफ आता फक्त लीग क्रिकेट खेळतो. आरसीबीच्या चाहत्यांना आता फॅफकडून खुप अपेक्षा आहेत कारण विराट कोहली कर्णधार असताना भलेही त्याची कामगिरी चांगली होती पण त्याला एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकला आलेले नाही.

https://twitter.com/RCBTweets/status/1502603973848494087?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1502603973848494087%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fhindi%2Fzee-hindustan%2Fsports-news%2Frcb-announced-faf-du-plessis-new-captain-in-ipl-next-season-know-all-details%2F1123119

महत्वाच्या बातम्या
‘थंडी, पाऊस आणि रक्ताच्या धारांमधून आमची..’, विराजस कुलकर्णीची पोस्ट चर्चेत
‘तुला कोणी हात लावला तर मला सांग’, माफियांपासून वाचवण्यासाठी ‘या’ अभिनेत्याने धरला होता शाहरूखचा हात
सायशा शिंदेने उघड केले गे बॉयफ्रेंडचे इंटिमेसी लाईफचे राज, म्हणाली, तो बाथरूमच्या बाहेर..
धक्कादायक! गुटखा तोंडात टाकला अन् लागला ठसका, तरूणाचा जागीच मृत्यु, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now