आयपीएल 2022 मध्ये आरसीबीचा संघ आतापर्यंत चांगली कामगिरी करत होता. संघाने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. पण शनिवारी झालेल्या सामन्यात (RCB vs SRH) संघ हैदराबादविरुद्ध 16.1 षटकात केवळ 68 धावा करू शकला. आयपीएलच्या इतिहासातील ही त्यांची दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.
हैदराबादसाठी डावखुरा वेगवान गोलंदाज मार्को येनसन आणि टी नजरजन या दोघांनी 3-3 विकेट घेतल्या. त्याचवेळी विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात गोल्डन डकवर म्हणजे झीरोवर आऊट झाला. यामुळे संघाला मोठी धावसंख्या करता आली नाही. RCB ची IPL इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या 49 धावा आहे.
49 ही धावसंख्या त्यांनी 23 एप्रिल 2017 रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध केली होती. आजची तारीख देखील 23 एप्रिल आहे. म्हणजेच ही तारीख संघासाठी शुभ म्हणता येणार नाही. हैदराबादविरुद्ध संघाचे 9 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. सुयश प्रभुदेसाईने 20 चेंडूत सर्वाधिक 15 धावा केल्या.
याशिवाय ग्लेन मॅक्सवेलनेही 11 चेंडूत 12 धावा केल्या. 3 खेळाडू शून्यावर बाद झाले. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. 23 एप्रिल 2013 रोजी आरसीबीकडून खेळताना त्याने पुणे वॉरियर्सविरुद्ध हा पराक्रम केला होता. त्याने 66 चेंडूंमध्ये हा विक्रम केला होता.
नाबाद 175 धावा केल्या होत्या आणि ती खेळी आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्यावेळी गेलने 13 चौकार आणि 17 षटकार मारले. स्ट्राइक रेटही 265 होता. पण गेलने खेळलेली संस्मरणीय खेळी संघाच्या या 2 सर्वात कमी धावसंख्यांमुळे मागे राहिली आहे. या स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खूपच खराब झाली.
या संघाने सलग दोन्ही सामने गमावले होते. यानंतर संघाने सलग 4 सामने जिंकून शानदार पुनरागमन केले. संघाने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. संघाचे सध्या 8 गुण असून ते पाचव्या क्रमांकावर आहे. या सामन्यात मोठा विजय मिळवून संघाला गुणतालिकेत झेप घ्यायची आहे.
महत्वाच्या बातम्या
सत्तेचा इतका माज? इतकी दंडुकेशाही?, राणा दाम्पत्याच्या अटकेवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
VIDEO: यशचा साधेपणा पाहून चाहते भावूक; म्हणाले, ‘तुझा हा साधेपणाच तुझ्या यशाचे खरे रहस्य आहे’
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन देणारा मनोज वायपेयींचा हा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ पाहिलात का? व्हाल भावूक