आयपीएल २०२२ मध्ये काही संघ हे दमदार कामगिरी करताना दिसत आहे. गुजरात टायटन्स आणि लखनऊ जाएंट्स हे संघ नवीन असतानाही जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे. पण चॅम्पियन म्हणून ओळख असणारे मुंबई आणि चेन्नई हे दोघेही संघ यावेळी खराब कामगिरी करत आहे.
चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचा कर्णधार यंदा एमएस धोनी नसून रविंद्र जडेजा होता. पण त्याच्या नेतृत्वात संघाला फक्त दोनच सामने जिंकता आले आहे. आतापर्यंत चेन्नईने आठ सामने खेळले असून त्यांना फक्त दोनच सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यामुळे संघ प्लेऑफमधून बाहेर जाण्याची शक्यता आहे.
अशात चेन्नईच्या संघाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. रविंद्र जडेजाने चेन्नईच्या संघाचे कर्णधारपद सोडले आहे. त्याच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे. रविंद्र जडेजा आयपीएलच्या मध्यात असा कोणता निर्णय घेईल असे कोणाला वाटलेही नव्हते.
आयपीएलमधील खराब कामगिरीनंतर रविंद्र जडेजाने कर्णधारपद सोडले आहे. त्याने पुन्हा एकदा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे. आतापर्यंत चेन्नईला ८ सामने खेळून केवळ २ सामने जिंकता आले, त्यामुळे आता पुढच्या सामन्यांमध्ये धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा संघ काही कमाल करेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
चेन्नईच्या प्रेस रिलीजनुसार, रविंद्र जडेजाने आपल्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि एमएस धोनीला चेन्नईचे नेतृत्व करण्याची विनंती केली आहे. धोनीने संघाच्या हितासाठी चेन्नईचे नेतृत्व करण्याचे मान्य केले आहे. तसेच जडेजाला त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याची परवानगीही दिली आहे.
रविंद्र जडेजा साधारणपणे आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करायचा केला होता. पण कर्णधारपदाच्या दबावाखाली त्याची कामगिरी फारच खराब झाली. अशा स्थितीत जडेजावर बरीच टीका होत होती. पण रविंद्र जडेजा एवढा मोठा निर्णय घेईल यावर अजूनही कोणाचा विश्वास बसत नाहीये.
महत्वाच्या बातम्या-
संस्कृत आपली राष्ट्रीय भाषा असली पाहिजे कारण.., हिंदी भाषेच्या वादात आता कंगनाची उडी
राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्या; गाडीतील अंकुश चौधरी आणि केदार शिंदे…
एकेकाळी होता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, आता निम्मी झाली संपत्ती, काय घडलं झुकरबर्गसोबत?