भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आपले द्विशतक सहज पूर्ण करू शकला असता. पण तो १७५ च्या वैयक्तिक स्कोअरवर खेळत असताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने डाव घोषित करण्याची घोषणा केली होती. (ravindra jadeja on test match)
रोहित शर्माच्या या घोषणेनंतर रोहितशिवाय प्रशिक्षक राहुल द्रविडवरही सोशल मीडियावर टीका करण्यात आली. रोहितने डावाची घोषणा नसती केली तर जडेजाने द्विशतक पूर्ण झाले असते, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. आता दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर खुद्द जडेजानेच याबाबतची सत्यता सांगितली आहे.
या भारतीय अष्टपैलू खेळाडूने सांगितले की, रोहित शर्माने नाही, तर मी डाव घोषित करण्याचा संदेश पाठवला होता. व्हेरिएबल बाऊन्स आणि टर्नचा फायदा आपल्या संघाने घ्यावा असे मला वाटत होते. जडेजाने २२८ चेंडूत १७५ धावा केल्या आणि नाबाद परतला. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक पूर्ण केले. जडेजाने कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्याही या डावात केली. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारताने ८ बाद ५७४ धावांवर डाव घोषित केला.
जडेजाने नाबाद खेळीत १७ चौकार आणि ३ षटकार मारले. जडेजाला दुहेरी शतक झळकावण्याची संधी होती परंतु खेळाडूने सांगितले की, डाव घोषित करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळेच कठीण परिस्थितीत प्रतिस्पर्धी संघाला एका सत्रात खेळण्याची संधी मिळाली असती, तसेच त्यांचे खेळाडूही खुप थकलेले होते.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जडेजा म्हणाला, खेळपट्टीवर व्हेरिएबल बाउन्स आहे आणि चेंडूही वळायला लागले होते. त्यामुळे खेळपट्टीवरून काही मदत मिळू शकते, असा संदेश मी पाठवला संघाला पाठवला होता. मला वाटले आता आपण त्यांना फलंदाजीला उतरु दिले पाहिजे.
३३ वर्षीय जडेजा म्हणाला, श्रीलंकन खेळाडू दोन दिवसांत पाच सत्रे क्षेत्ररक्षण करून आधीच थकले होते. त्यामुळे ते येताच मोठे फटके खेळून दीर्घकाळ फलंदाजी करत राहणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. त्यामुळे डाव लवकर घोषित करून प्रतिस्पर्ध्याच्या फलंदाजांच्या थकव्याचा फायदा घ्यायचा, अशी योजना होती.
आपल्या शतकाबाबत तो म्हणाला, जेव्हाही मी भारतासाठी खेळतो तेव्हा प्रत्येक सामन्यात माझा खेळ सुधारण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा मला धावा जोडण्याची संधी मिळते, तेव्हा मी संधीचे रूपांतर कामगिरीत करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या या खेळीमुळे मला खूप आनंद झाला.
महत्वाच्या बातम्या-
प्रचंड गाजावाजा झालेला ‘झुंड’ बाॅक्स आॅफीसवर फ्लाॅप; फर्स्ट डेला झाली फक्त ‘एवढीच’ कमाई
जात.. जात नाही तोवर माणूस म्हणवून घ्यायची लायकी नाही, त्यामुळे…; केदार शिंदेंचे झुंडवरचे ‘ते’ ट्विट व्हायरल
…म्हणून शेन वॉर्न इतक्या लवकर गेला; वॉर्नच्या मृत्युवर सुनील गावस्करांचे धक्कादायक वक्तव्य