Share

कपिल देवचा ३६ वर्षांपूर्वीचा विक्रम रविंद्र जडेजाने काढला मोडून; ‘हा’ विक्रम करणारा बनला दुसरा भारतीय फलंदाज

श्रीलंकेविरुद्ध मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने पहिला डाव ५७४ धावांवर घोषित केला. टीम इंडियाने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ८ विकेट गमावून ५७४ धावा केल्या आहेत. यादरम्यान रवींद्र जडेजाने नाबाद १७५ धावांची खेळी केली. डाव घोषित होताच तो द्विशतक झळकावण्यास मुकला. पण जडेजाच्या नावावर एक खास विश्वविक्रम नोंदवला गेला. (ravindra jadeja new record in test)

अष्टपैलू रवींद्र जडेजाने २२८ चेंडूत नाबाद १७५ धावा केल्या. त्याच्या खेळीत १७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. या खेळीमुळे जडेजाने विश्वविक्रम केला. सहाव्या विकेटच्या किंवा त्यानंतर आलेल्या खेळाडूंसोबत एका डावात तीन शतकीय भागीदारी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. जडेजापूर्वी कोणत्याही खेळाडूला ही कामगिरी करता आली नाही.

तसेच त्याने माजी अष्टपैलू कपिल देव यांचा विक्रम मोडला आहे. मोहाली कसोटीत त्याने नाबाद १७५ धावांची खेळी केली. आता जडेजा भारतासाठी सातव्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने कपिल देव यांचा ३६ वर्ष जुना विक्रम मोडला आहे. कपिल देव यांनी १९८६ मध्ये कानपूरमध्ये सातव्या क्रमांकावर मैदानात उतरुन श्रीलंकेविरुद्ध १६३ धावा केल्या होत्या.

दरम्यान, मोहाली कसोटीत रवींद्र जडेजाने ऋषभ पंतसह सहाव्या विकेटसाठी १०४ धावा केल्या. त्याने रविचंद्रन अश्विनसोबत ७ व्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी केली. यादरम्यान जडेजासोबत ६४ धावांची भागीदारी करत असताना अश्विन बाद झाला.

अश्विन आणि रविंद्र जडेजाने ८२ चेंडूंचा सामना करताना ८ चौकारही मारले होते. त्यानंतर जडेजाने मोहम्मद शमीसोबत ९ व्या विकेटसाठी १०३ धावांची नाबाद भागीदारी केली होती. मोहाली कसोटीत भारताने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट गमावून ५७४ धावा करून पहिला डाव घोषित केला.

या डावात रविंद्र जडेजाने १७५ धावांचे योगदान दिले. तर ऋषभ पंतचे शतक हुकले. पंतने ९६ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा २९ आणि विराट कोहली ४५ धावा करून बाद झाला. तर हनुमा विहारीने ५८ धावांचे योगदान दिले. यावेळी रविंद्र जडेजाने केलेल्या रेकॉर्डमुळे सर्वांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर महिला अधिकारी म्हणाली, हे फक्त माझ्या एकटीसाठी नाही, तर..
मोठी बातमी! सोनाक्षी सिन्हा विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, वाचा संपूर्ण प्रकरण
अमेरिकन शेअर्समधून भारतीय गुंतवणूकदार करणार मोठी कमाई, शेअर बाजाराने सुरु केली ‘ही’ सुविधा

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now