Share

पैसा कमवण्यासाठी दुखापत झालेले खेळाडू देखील IPL वेळी फिट होतात; रवी शास्त्रींचा थेट निशाणा

भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (ravi shastri) हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादांना तोंड फुटले आहे. आता त्यांनी पुन्हा आयपीएल संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे ज्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शास्त्रींच्या म्हणण्यानुसार आयपीएल हे जगातील सर्वोत्तम फिजिओथेरेपिस्ट म्हणून काम करते.

यात जखमी खेळाडू स्पर्धा सुरू होण्यावेळी फिट होण्याची क्षमता आहे. आता यामध्ये लोकांना हे कळत नाहीये की रवी शास्त्री यांनी आयपीएलचे कौतुक केले आहे की टोला लगावला आहे. त्याआधी आपण पुन्हा एकदा शास्त्रींच्या वक्तव्यावर एकदा नजर टाकूया. रवी शास्त्री म्हणाले की, आयपीएल जगातील सर्वोत्तम टी-२० लीग आहे.

तसेच ही जगातील महान फिजिओ आहे. कारण आयपीएल लिलावाच्या आधी सर्वजण फिट होऊ इच्छितात, प्रत्येकाला आयपीएल खेळायची असते. दरम्यान, आयपीएलचा १५ वा सिजन लवकरच सुरू होणार आहे. पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरोधात कोलकाता नाईट रायडर्स यांच्या यांच्यामध्ये होणार आहे.

भारतीय संघाचे सात वर्षे प्रशिक्षक पद सांभाळलेले रवी शास्त्री पुन्हा एकदा समालोचकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यावेळी त्यांनी बीसीसीआयच्या नियमांवर प्रश्न उपस्थित केले होते. ते म्हणाले की, एका खराब नियमामुळे मी समालोचन करू शकत नव्हतो. यावेळी शास्त्रींसोबत सुरेश रैनाही आयपीएलमध्ये समालोचनाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हे सर्वांनाच माहिती आहे की सुरेश रैना हा सुरूवातीपासूनच चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता पण यावेळी त्याला चेन्नईने संघात घेतलेच नाही. चेन्नईबद्दल बोलताना रवी शास्त्री म्हणाले की भविष्यात धोनीची जागा जडेजा घेऊ शकतो. संघात रायडू, ब्रावोसारखे अनुभवी खेळाडू आहेत पण जडेजा अधिक उजवा ठरतो असे ते म्हणाले.

यावर्षीपासून आयपीएलमध्ये ८ एवजी १० संघ खेळणार आहेत. या संघाना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक संघ त्यांच्या त्यांच्या गटातील संघासोबत २ तर विरूद्ध गटातील संघासोबत १ सामना खेळणार आहे. अन्य संघांसोबत त्यांचा फक्त एकदा सामना होणार आहे.

महत्वाच्या बातम्या
”..त्यावेळी मनोहर जोशींनी बाळासाहेबांच्या सांगण्यावरून राजीनामा दिला होता, हाच नियम येथे लागू होतो का?”
धक्कादायक! पत्नी झोपेत असताना शेजारी झोपलेल्या पतीचा झाला खून, पोलिसांनी पत्नीलाच घेतलं ताब्यात
महाराष्ट्रातही अभ्यासक्रमात भगवतगीतेचा समावेश करणार का? शिक्षणमंत्र्यांनी स्पष्टच सांगीतलं..; म्हणाले..
नितीन गडकरींची संसदेत मोठी घोषणा; पुढच्या तीन महिन्यांत ‘हे’ टोल नाके होणार कायमचे बंद

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now