भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बुधवारी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या आयपीएल 2022 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून झालेल्या पराभवाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ते म्हणाले की जप्रीत बुमराहला नेहमी डेथ ओव्हर्समध्ये ठेवू नये.
शास्त्री म्हणाले की, यावेळी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी आक्रमणात तितकी खोली राहिलेली नाही आणि बुमराहचा अशा प्रकारे वापर केला पाहिजे की मुंबई संकटात असताना कधीही त्याचा वापर करू शकेल, केवळ डेथ ओव्हर्ससाठी त्याचा उपयोग करणे चुकीचे आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएल 2022 मधील तिसरा आणि चौथा सामना गमावला.
केकेआर विरूद्धच्या सामन्यात डॅनियल सॅम्सने एका षटकात 35 धावा दिल्या, ज्यामुळे पॅट कमिन्सने KKR ला IPL टेबलमध्ये पहिल्या स्थानी नेऊन ठेवले होते. कमिन्सने अवघ्या 15 चेंडूत 56 धावा केल्या होत्या. मुंबईला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती आणि 10 षटकांत 3 बाद 55 धावा झाल्यामुळे त्यांना सुरुवातीला संघर्ष करावा लागला.
मात्र ते 161 धावा करण्यात यशस्वी ठरले. सूर्यकुमार यादवने पुनरागमन करत 36 चेंडूत 52 धावा केल्या. टिळक वर्मा आणि किरॉन पोलार्ड यांनीही चांगले योगदान दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सच्या 11.4 षटकात 83/4 अशी स्थिती होती आणि सामना त्यांच्या हाताबाहेर जाताना दिसत होता.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पॅट कमिन्सने 14 चेंडूत 4 चौकार आणि 6 षटकारांसह सर्वात वेगवान 50 धावा ठोकल्या. जसप्रीत बुमराहने KKR विरुद्ध फक्त 3 षटके टाकली. जसप्रीत बुमराहने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 3.2 षटकांत 43 धावा दिल्या, परंतु दुसऱ्या सामन्यात त्याने 4 षटकांत केवळ 17 धावा दिल्या आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध तीन विकेट घेतल्या.
KKR विरुद्धच्या सामन्यानंतर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, बुमराहचा वापर मुंबई इंडियन्ससाठी एक समस्या आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मला वाटते बुमराहचा अधिक चांगला वापर केला पाहिजे. काहीवेळा तुम्ही त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा ठेऊ शकत नाही किंवा तुमच्या गोलंदाजीमध्ये सखोलता नाही. त्यामुळे विकेट शोधण्याऐवजी तुम्ही त्याला फक्त एक किंवा दोन फलंदाजांसाठी डेथ ओव्हर्समध्ये ठेवा.
रवी शास्त्री म्हणाले की, डेथ ओव्हर्समध्ये संघाच्या फलंदाजीत गती असेल तर पुढे कोणताही गोलंदाज असला तरी ते धावा करण्याचा प्रयत्न करतील. रवी शास्त्री म्हणाले की, बुमराहचा वापर खेळाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर केला पाहिजे. फक्त डेथ ओव्हर्सशिवाय बाकीच्या वेळेलाही त्याचा वापर केला पाहिजे जेणेकरून संघाला विकेट्स मिळतील.
महत्वाच्या बातम्या
कीर्तनकारांचा संभोग करतानाचा व्हिडिओ व्हायरल; तृप्ती देसाई यांनी लोकांना केले ‘हे’ आवाहन
चहल प्रकरणात रवी शास्त्रींना संताप अनावर; म्हणाले, दारू पिऊन जीवाशी खेळ ही चेष्टेची गोष्ट नाही…
रूपाली चाकणकरांचा पोरगा ‘या’ सिनेमातून करणार अभिनय क्षेत्रात पदार्पण; चाकणकर म्हणतात…
“हिंदुत्व हरले, मुस्लीम मतांची काळजी जिंकली आणि राज ठाकरे पुन्हा बदलले”