Share

हनुमान चालिसा पठण करतच रवी राणा जेलमधून बाहेर; म्हणाले, न्यायालयाच्या…

राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन आणि हनुमान चालिसा पठणावरुन वातावरण तापलेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. (ravi rana going to meet navneet rana)

रवी राणा आणि नवनीत राणा या दोघांनाही १३ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर त्यांना आता जामीन मिळाली आहे. आता १३ दिवस जेलमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर रवी राणा जेलमधून बाहेर पडले आहे. यावेळी ते हनुमान चालिसा पठण करतच जेलमधून बाहेर आले आहे. त्यानंतर ते नवनीत राणांच्या भेटीला निघणार आहे.

राणा दाम्पत्याला मुंबई हायकोर्टाने जामीन मंजुर केला आहे. १३ दिवसानंतर रवी राणा यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. आज सकाळीच रवी राणा यांच्या जामीनाचे पेपर तुरुंगात पोहचले होते. त्यानंतर दुपारी त्यांची सुटका झाली. जेलमधून बाहेर पडल्यानंतर राणा हे गाडीतच हनुमान चालिसा पठण करताना दिसून आले.

मुंबई हायकोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी आता माध्यमांशी संवाद साधला आहे. आपण कोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन करणार असल्याचे रवी राणा यांनी सांगितले आहे. त्यानंतर रवी राणा लीलावती रुग्णालयाकडे रवाना झाले.

दरम्यान, नवनीत राणा यांचीही न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे. पण त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तुरुंगात राहून नवनीत राणा यांना त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती खराब झाली होती.

तुरुंगात राहून नवनीत राणा यांना ब्लड प्रेशरचा त्रास होऊ लागला होता. तसेच स्पॉनडलायसिस आणि अंगदुखीचाही त्रास त्यांना होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. आता रवी राणाही त्यांच्या भेटीला पोहचणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
मराठा क्रांती मोर्चाने गुणरत्न सदावर्तेंना हिसका दाखवलाच! पुण्यात पोलिस ठाण्याबाहेर प्रचंड राडा
तुरुंगातून बाहेर आलेल्या रवी राणांना पाहून नवनीत राणा हमसून हमसून रडू लागल्या, पहा व्हिडिओ
राम मंदिराच्या उभारणीची संपुर्ण टाईमलाईन, जाणून घ्या कधी पुर्ण होणार राम मंदिराचे काम?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now