जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख असलेल्या यासीन मलिक (yasin malik) याला दिल्लीच्या विशेष एनआयए न्यायालयाने बुधवारी टेरर फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, अन्य ५ गुन्ह्यांच्या प्रकरणी १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासीन मलिक हा JKLF चा नेता असून केंद्राने २०१९ मध्ये JKLF वर बंदी घातलेली होती. त्याला केलेल्या या शिक्षेमुळे अनेक स्तरांतून भारतावर आरोप केले गेले आहेत.
यासिन मलिक याने मास्टर हाफिज सईदच्या (hafeez sayeed) मदतीने पाकिस्तान या दहशतवादी देशातील खोऱ्यात दहशत पसरवलेली होती. 1990 मध्ये यासीन मलिकने हवाई दलाच्या अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार देखील केला होता. या हल्ल्यामध्ये 40 जन जखमी झाले होते तर ४ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. स्क्वाड्रन लीडर रवी खन्ना यांच्या अंगावर २६ गोळ्या लागून ते या हल्ल्यात शहीद झाले होते.
त्यांच्या पत्नी निर्मल खन्ना यांनी यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती यामुळे यासिन मलिकला दिलेली ही शिक्षा त्यांना मान्य नाही. माझ्या पतीला मारल्यानंतरही तो ३२ वर्षे फिरत राहिला त्याला आणखी काय हवे, असा सवाल त्यांनी टीव्ही चॅनलशी संवाद साधताना उपस्थित केला आहे.
यासिन मलिकचा बचाव होण्यासाठी बोलणाऱ्या लोकांना निर्मल म्हणाल्या आहेत की, या लोकांच्या भरवशावर ज्यांची दुकाने सुरू आहेत त्यांना धक्का बसला असेल. याचसोबत पुढे बोलताना त्या म्हणाल्या आहेत की, डॉ. मनमोहन सिंग यांना मी माझे प्रेरणास्थान मानत असे. पण जेव्हा ते यासिन मलिक यांना भेटले तेव्हा मला वाईट वाटले.
न्यायालयात सुनावणी दरम्यान हजर असलेले वकील फरहान यांनी यासीन मलिक न्यायालयात काय बोलला आहे या बद्दल माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, होणाऱ्या शिक्षेबद्दल मला काही बोलायचं नाही, असं यासीन मलिकने न्यायालयात सांगितलेलं आहे.
तसेच माझ्याविरुद्ध लावण्यात आलेल्या युएपीएचे कलम १६, कलम १७,कलम २८, कलम २० आणि भादंवि कलम १२० ब व १२४ ए या आरोपांना मी आव्हान देणार नाही, असं यासीनने न्यायालयात सांगितलेलं आहे. याचसोबत माझ्याकडून शिक्षेबद्दल कोणत्याही प्रकारचे भाष्य केले जाणार नाही. न्यायालयाने योग्य ती शिक्षा द्यावी, असं मलिक न्यायालयात म्हणाला होता.
महत्वाच्या बातम्या
शिवसेनेने डावलल्यानंतर संभाजीराजेंची फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल; राजकीय समीकरण बदलणार?
प्राजक्ता माळीच्या आधी ‘या’ मराठी अभिनेत्रींनी दिलेत बोल्ड सिन्स, सर्व मर्यादा केल्या होत्या पार
कधीतरी आमच्या आयुष्यात पण डोकवा, अमृता खानविलकरनं सगळ्यांसमोर जोडले हात; फोटो व्हायरल
धोनीचा व्हायरल फोटो पाहून चाहत्यांना धक्का, क्रिकेट सोडून निवडणुकीच्या ड्युटीवर करतोय काम?