Share

रत्नागिरीत येणार भोंग्यांच्या आवाजांवर नियंत्रण, मुस्लीम बांधवांनी घेतला कौतूकास्पद निर्णय

राज्यात सध्या मशिदींवरील भोंग्यांवरुन वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर राज्याचे वातावरण तापले होते. काही मुस्लिम संघटनाही याच्या विरोधात बोलत होत्या. (ratnagiri muslim desicion about mosque loudspeaker)

अशात रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी एक कौतूकास्पद निर्णय घेतला आहे. रत्नागिरीतील मुस्लिम बांधवांनी अत्याधुनिक साऊंड सिस्टिमचा वापर करुन आवाजावर नियंत्रण ठेवणारी ध्वनिक्षेपक यंत्रणा सर्व मशिदींमध्ये लावण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरीचे पोलिस निरीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती. रत्नागिरी शहर पोलिस स्थानकांर्गत शांतता कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुस्लिम बांधवांनी घेतलेला हा निर्णय नक्कीच कौतूकास्पद आहे.

रत्नागिरीमध्ये सर्वधर्मीय लोक एकोप्याने राहताना दिसतात. त्यांच्यातील हा सलोखा कायम राहावा, असे आवाहन यावेळी मोहित गर्ग यांनी केले आहे. यावेळी पोलिस मुख्यालयात एक शांततेची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीत मुस्लिम समाजातर्फे रफिक बिजापूरकर यांनी भोंग्यांचा आवाद मर्यादित ठेवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा सर्व मशिदींवर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पहाटेच्या सुमारास अत्यंत कमी आवाजात आणि कमी वेळेसाठी अजान दिली जाईल, असेही रफिक बिजापूरकर यांनी म्हटले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या काही दिवसांत होणार आहे.

मनसे शहराध्यक्ष अमोल श्रीनाथ यांनीही रत्नागिरी जिल्ह्यातील हिंदू-मुस्लिम बांधव नेहमीच एकत्र राहतात, असे म्हटले आहे. भोंग्यांचा आवाज मर्यादित झाल्यास मनसेचा कोणताही आक्षेप नाही. आम्ही सर्व समाजाचे बांधव एकत्रितपणे आमचे सण, उत्सव साजरे करणार, असेही अमोल श्रीनाथ यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
heropanti 2 review: डान्स आणि ऍक्शनने वेड लावतोय टायगर, नवाजुद्दीनचे कॉम्बिनेशन आहे हिट
मेट्रोमध्ये गर्दीचा फायदा घेत तरुणीसोबत केले ‘हे’ गैरकृत्य; सीसीटीव्हीच्या मदतीने तरुणाला केली अटक
चुकीला माफी नाही! वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी राज ठाकरेंच्या गाडीवर हजारोचा दंड

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now