आसाममध्ये कॅन्सर हॉस्पिटलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. भाषण देताना, आयुष्याचे उरलेले क्षण आरोग्य सेवेसाठी देणार असल्याचे रतन टाटा यांनी म्हटले आहे. यावेळी उपस्थित असलेल्या लोकांच्या डोळ्यातही अश्रू अनावर झाले होते. (ratan tata speech on their life)
मला हिंदीत भाषण देता येणार नाही म्हणून मी इंग्रजीत बोलेन, असे रतन टाटा यांनी म्हटले होते. पण काही वेळ इंग्रजीत बोलल्यानंतर रतन टाटा स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यानंतर तोडक्या मोडक्या हिंदीत बोलून ते भाषण देऊ लागले. वयाच्या प्रभावामुळे त्यांच्या आवाजात थरथर जाणवत होती. तसेच त्यांचे हातही थरथरत होते.
कॅन्सरची रुग्णालये बांधण्यात टाटांचाही सरकारसोबत वाटा आहे. कार्यक्रमात पंतप्रधान मोदी मंचावर उपस्थित होते. यावेळी रतन टाटा यांनाही बोलावण्यात आले होते. वयामुळे टाटा कसे तरी सहाकऱ्यांच्या मदतीने माईकजवळ आले आणि बोलू लागले. ते म्हणाले की, मला हिंदी जास्त बोलता येणार नाही, त्यामुळे मी इंग्रजीत बोलेन.
रतन टाटा यांनी आसाममध्ये कर्करोग रुग्णालये सुरू होत असून हा इतिहासातील एक मोठा दिवस असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, आसाम हेल्थकेअर आणि कॅन्सर उपचाराच्या क्षेत्रात आसाम एक चांगली कामगिरी करत आहे. यावेळी पीएम मोदी टाटांची प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकताना दिसले.
काही वेळ इंग्रजीत बोलल्यानंतर टाटांनी हिंदीत बोलण्यास सुरुवात केली. तुटक्या हिंदीत बोलताना म्हटले की, आज आसाम जगाला सांगू शकतो की भारताचे एक छोटे राज्य कर्करोग बरा करू शकते. टाटांनी मोदींचे आभार मानत म्हटले की, मी मोदी सरकारचे आभार मानतो की, ते आसामला विसरले नाहीत. मला आशा आहे की हे राज्य पुढे जाईल.
याच कार्यक्रमात मोदींनी धुबरी, गोलपारा, गोलाघाट, शिवसागर, नलबारी, नागाव आणि तिनसुकिया येथील सात रुग्णालयांची पायाभरणी केली. टाटा ट्रस्टच्या प्रवक्त्याने यापूर्वी सांगितले होते की, अशी आणखी तीन कर्करोग उपचार केंद्रे पूर्णत्वाकडे आहेत आणि या वर्षाच्या शेवटी त्यांचे उद्घाटन केले जाईल.
महत्वाच्या बातम्या-
भाजपला उलथवून टाकणे ही वाईट कल्पना, राजकीय आघाडीची गरज नाही, केसीआरचा बदलला सुर, ममताही झाल्या शांत
24 वर्षांच्या ‘या’ खेळाडूला बनवा टिम इंडियाचा कर्णधार, युवराज सिंगने बोलून दाखवली मनातली इच्छा
खुशखबर! फक्त ३०० रूपयांत मिळणार ५ लाख रूपयांचा हेल्थ इन्शूरन्स; ‘असा’ घ्या लाभ