शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे हे जोखमीचे काम आहे. पण त्याचा जर अभ्यास करुन तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्ही नक्कीच मालामाल होऊ शकतात. शेअर मार्केटमध्ये काही कंपन्या अशा आहेत, ज्यांच्या शेअरच्या किंमती नेहमी वाढतच जातात. टाटा ग्रुपमध्ये असणाऱ्या कंपन्यांचेही तसेच काहीसे आहे. या ग्रुपमध्ये असणाऱ्या कंपनींचे शेअरच्या किंमती या वाढतच जाताना दिसतात. (ratan tata elxi company share good returns)
टाटा एलेक्सी या कंपनीच्या शेअर्सने गेल्या तीन वर्षांत त्यांच्या गुंतवणूकदारांना तब्बल ७२५ टक्के परतावा दिला आहे. टाटा ग्रुपच्या या कंपनीचा स्टॉक, जो १८ एप्रिल २०१९ रोजी ९५६ रुपये होता, तोच आता ८१९० रुपयांवर व्यवहार करत आहे.
३ वर्षांपूर्वी टाटा एलेक्सी शेअर्समध्ये १ लाख रुपये कोणी गुंतवले असते, तर आज त्याचे सुमारे ९ लाख रुपये झाले असते. या शेअरने बेंचमार्क निर्देशांकापेक्षा अधिक मजबूत परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा टाटा ग्रुपवरील विश्वास वाढत चालल्याचे दिसून येते.
तिमाहीचे निकाल जाहीर करताना कंपनीने सांगितले की, बोर्डाने गत आर्थिक वर्षासाठी ४२५ टक्के लाभांश देण्याची शिफारस केली आहे. या कंपनीचा निव्वळ नफा जानेवारी-मार्चच्या तिमाहित १६० कोटींनी वाढला आहे. जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत सुमारे ३९ टक्क्यांनी वाढला आहे.
५ एप्रिल १९९६ रोजी टाटा एलेक्सीच्या शेअरची किंमत १०.६३ रुपयांच्या पातळीवर होती. याच शेअरची किंमत आता ८१९० रुपयांवर पोहचली आहे. जर एखाद्याने १९९६ मध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये १० हजार रुपये गुंतवले असते तर त्याचे आज ७३.४५ लाख रुपये झाले असते.
तसेच १९९६ मध्ये टाटा एलेक्सीच्या कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे ७.३४ कोटी रुपये झाले असते. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सने ७३,३०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा या कंपनीवरचा विश्वास वाढतच चालला आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘या’ शुगर स्टॉकमुळे गुंतवणूकदारांचे आयुष्य झाले गोड, वर्षभरात दिला तब्बल ४४० टक्के परतावा
मलिकांची सुटका नाहीच! आता ईडीच्या विरोधातील याचिका फेटाळत कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय
मिटकरींचा पाय खोलात! ‘हिंदू समाज या बांडगुळांना अन् शकूनी मामाच्या फौजेला उत्तर देईल’